नवोदित अभिनेत्रीची इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 18:04 IST2019-08-30T18:03:12+5:302019-08-30T18:04:47+5:30
याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नवोदित अभिनेत्रीची इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या
मुंबई - ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडवाला परिसरात एका नवोदित अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. काल रात्री १२. ३० वाजताच्या सुमारास घडली घटना असून पर्ल पंजाबी असं तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अंधेरी येथील ओशिवरा भागात काल रात्री एका उच्चभ्रू इमारतीच्या गच्चीवरून एका २२ ते २५ वर्षांच्या तरुणीने उडी मारून आत्महत्या केली आहे. पर्ल पंजाबी नावाच्या अभिनेत्रीने सिनेसृष्टीत अपेक्षित यश न मिळाल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या मुलीचे घरात आईशी सतत वाद सुरू असल्याचीही माहिती पुढे येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीची मानसिक स्थितीही चांगली नव्हती. याअगोदर देखील तिने २ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. काल रात्री १२ वाजता घरात पुन्हा वाद झाल्यानंतर तिने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचं बोललं जातं आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.