शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Video : अनैतिक संबंधातून जन्मलेलं नवजात बाळ आईने धावत्या लोकलमध्ये पिशवीत गुंडाळून ठेवलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 22:25 IST

Crime News : नवजात बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून सोडणाऱ्या महिलेला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कल्याण क्राईम ब्रांचच्या युनिट ३ ने महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. 

आईच्या काळजाला चटका लावणारी बातमी कल्याण येथून समोर आली आहे. धावत्या लोकलमध्ये एका नवजात बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून सोडणाऱ्या महिलेला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कल्याण क्राईम ब्रांचच्या युनिट ३ ने महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. 

डोंबिवलीत राहणाऱ्या एका महिनेने तिचे नवजात बाळ टिटवाळा रेल्वे स्थानकात लोकलमध्ये सोडून पळ काढला होता. कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने या महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. 20 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती.20 नोव्हेंबर रोजी टिटवाला रेल्वे स्थानकात ट्रेन मध्ये एका पिशवीत नवजात बाळ आढळून आले होते. कल्याण जीआरपीने या प्रकरणी भादंवि  317 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणाचा तपास कल्याण जीआरपी सह कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचही तपास करीत होते. हा तपास करीत असताना क्राईम ब्रांचने सर्व स्थानकातील सीसीटीव्ही तपासले. कोपर रेल्वे स्थानकातून एक महिला स्थानकात बसली होती. तिच्या हाती एक पिशवी होती. ज्या पिशवीत ते बाळ सापडले. ती पिशवी आणि महिलेच्या हातातील पिशवी सारखीच दिसून आली. तिच महिला असावी अशी पोलिसांना शक्यता होती. याच शक्येतेच्याआधारे पोलिसांनी तपास केला. या महिलेचा पोलिसांनी पत्ता शोधून काढला. ही महिला डोंबिवलीच्या देवीच्या पाडा परिसरात राहणारी आहे.

  

या बाबत कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे पोलिस अधिकारी अशरद शेख यांनी माहिती दिली आहे की, या महिलेचे एका विवाहित पुरुषासोबत संबंध होते. त्या महिलेला त्याने घर घेऊन दिले होते. त्यांच्या दोघांतील अनैतिक संबंधामुळे तिने बाळाला जन्म दिला. हे बाळ नकोसे झाल्याने तिने बाळाला रेल्वे ट्रेनमध्ये सोडले होते. यात तिच्या प्रियकराचाही समावेश होता. पोलिसांनी या दोघांना बेडय़ा ठोकल्या आहेत. अनैतिक संबंधातून हे मुल जन्माला आले होते. त्याचे पालकत्व लपवण्यासाठी त्यांनी हे वाईट कृत्य केल्याचं कबुल केलं आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वेkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीPoliceपोलिसArrestअटक