शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
4
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
5
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
6
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
7
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
8
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
9
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
10
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
11
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
12
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
13
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
14
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
15
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
16
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
17
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
18
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
19
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
20
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले

CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 10:15 IST

दिल्ली विद्यापीठातील २० वर्षीय विद्यार्थिनीशी संबंधित अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात नवनवीन ट्विस्ट येत आहेत.

दिल्ली विद्यापीठातील २० वर्षीय विद्यार्थिनीशी संबंधित अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात नवनवीन ट्विस्ट येत आहेत. पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, पीडितेने मुख्य आरोपी म्हणून ज्याचं नाव सांगितलं तो घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थितच नव्हता. करोल बाग परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो तरुण बाईकवरून कामावर जाताना दिसतो. या व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर दिल्लीपोलिसांनी त्याला क्लीन चिट दिली आहे.

उत्तर दिल्लीतील मुकुंदपूर भागात ही घटना घडली, जेव्हा २० वर्षीय दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे कॉलेजला जात होती. बाईकवरून आलेल्या तीन तरुणांनी तिच्यावर अ‍ॅसिड फेकलं, ज्यामुळे ती गंभीर भाजली. विद्यार्थिनीने आरोप केला आहे की, जितेंद्रने त्याचे दोन मित्र इशान आणि अरमान यांच्यासह तिच्यावर हल्ला केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोल बागमधील सीसीटीव्ही फुटेज जितेंद्रच्या दाव्याला पुष्टी देतं की तो घटनेच्या वेळी कामासाठी करोल बागमध्ये जात होता. सध्या पोलीस इतर दोन आरोपींचा शोध घेत आहेत आणि प्रकरणाशी संबंधित उर्वरित पुरावे तपासले जात आहेत. याच दरम्यान पोलिसांनी अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेचे वडील अकील यांना अटक केली. पीडितेच्या वडिलांनी अ‍ॅसिड हल्ल्यात जितेंद्रला अडकवण्यासाठी कट रचल्याचं कबुल केलं.

पीडितेच्या वडिलांनी मुलीचा पाठलाग करणाऱ्या जितेंद्रला अडकवण्यासाठी हा हल्ला केल्याचं कबुल केलं आहे. विद्यार्थिनीने स्वतःच अ‍ॅसिड आणलं होतं. अकीलने सांगितलं की, जितेंद्रची पत्नी त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा खटला दाखल करत होती, म्हणून त्याने त्याला अ‍ॅसिड हल्ल्याच्या प्रकरणात अडकवण्याचा निर्णय घेतला.

English
हिंदी सारांश
Web Title : Twist in Acid Attack Case: Accused Spotted Elsewhere on CCTV

Web Summary : Delhi acid attack case takes a turn. The accused was not at the crime scene, CCTV footage confirms. Victim's father confessed to framing him due to a prior dispute, revealing a conspiracy behind the attack.
टॅग्स :delhiदिल्लीStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस