शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

नव्या पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार; पहिल्याच दिवशी नागपूरात एकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 15:18 IST

नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी नागपुरात येण्याच्या काही तासापूर्वी या घटना घडल्या. 

ठळक मुद्देविलास रामाजी वरठी (वय ५४) हा धंतोलीतील यशवंत स्टेडियमजवळच्या फुटपाथवर राहत होता.डोंगरेने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.

नागपूर - धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. तर लकडगंज आणि अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोघांवर प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या. नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी नागपुरात येण्याच्या काही तासापूर्वी या घटना घडल्या. 

विलास रामाजी वरठी (वय ५४) हा धंतोलीतील यशवंत स्टेडियमजवळच्या फुटपाथवर राहत होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री ७ वाजता तो फुटपाथवर बसून होता. तेथे आरोपी मुकेश आणि त्याचा भाऊ अमोल दादारावजी मांडवकर (रा. दिघोरी) आले आणि वरठीला चिडवू लागले. आमच्याकडे पाहून का थुकला अशी विचारणा करून आरोपींनी  वरठी याच्याशी वाद घातला.  एकमेकांना शिवीगाळ केल्यानंतर आरोपी मुकेश आणि अमोलने लोखंडी रॉडने वरठी यांच्या वर हल्ला चढवला. डोक्यावर जबर फटका बसल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या वरठी यांचा मृत्यू झाला. भारत विलास वरठी (१८) याने दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी आरोपी मुकेश आणि अमोल मांडवकर या दोघांना गुरुवारी रात्री अटक केली.ट्रक ड्रायव्हरचा हल्लालकडगंजच्या वर्धमान नगरात एका ट्रान्सपोर्टरकडे अरुण जागोजी जुमळे  (४८) आणि आरोपी गोपी दयाराम शाहू (३२) हे दोघे ट्रक ड्रायव्हर म्हणून कामाला आहेत. त्यांच्यात आपसात थट्टा-मस्करीही चालायची. गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास आरोपी शाहूने जुमळे यांना बेवडा म्हणून चिडवले. त्यावरून दोघांत वाद झाला. तो टोकाला गेल्यानंतर आरोपीने लोखंडी पाईपने जुमळे यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. जुमळे यांचा मुलगा नवीन (१७) हा वडिलांना वाचविण्यासाठी पुढे धावला असता त्यालाही आरोपीने मारहाण केली. आजूबाजूची मंडळी धावली आणि त्यांनी आरोपीला आवडरले. त्यानंतर स्वप्निल अरुण जुमळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शाहूला अटक केली. अशाच प्रकारे मानेवाडातील बजरंगनगरात राहणारा आरोपी भूषण उमाटे याने सुमित राजेंद्र डोंगरे याला गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास एक्टिवानेकट मारला. शुभमने आरोपी भूषणला जाब विचारला असता त्याने वाद घातला आणि आपल्या पाच साधी साथीदारांना बोलवून शुभम डोंगरेवर हल्ला चढवला. त्याला लाठ्याकाठ्याने मारून गंभीर जखमी केले. डोंगरेने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.

 

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

 

सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर

 

ईडीकडून सुशांतचा भागीदार वरूण माथूरची चौकशी, गौरव आर्याचे मोबाईल जप्त

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

 

मथुरेत परदेशी तरुणीवर पाकिस्तानी युवकाकडून बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

 

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूरcommissionerआयुक्त