नागपुरात साथीदारांच्या मदतीने शेजाऱ्यांची वाहने जाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 20:41 IST2019-11-16T20:40:54+5:302019-11-16T20:41:44+5:30
जुन्या वादातून शेजाऱ्याच्या घरासमोर उभी असलेली पाच वाहने जाळल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता इमामवाडाच्या सिरसपेठ तेलीपुरा भागात घडली आहे.

नागपुरात साथीदारांच्या मदतीने शेजाऱ्यांची वाहने जाळली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुन्या वादातून शेजाऱ्याच्या घरासमोर उभी असलेली पाच वाहने जाळल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता इमामवाडाच्या सिरसपेठ तेलीपुरा भागात घडली आहे. आरोपीत तेलीपुरा येथील रहिवासी गणेश मानेकर (२८), विक्की सातनूरकर (२८), आशु मडावी (३०) आणि त्यांच्या एका साथीदाराचा समावेश आहे. तेलीपुरा येथील रहिवासी शालु पोहरवारचा (४०) मुलगा अक्षयसोबत गणेश मानेकरचा काही महिन्यापासून वाद सुरु आहे. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता तेलीपुरा येथील रहिवासी मयुर प्रकाश पोहरवारने साथीदारांच्या मदतीने गणेशसोबत सुरु असलेल्या जुन्या वादातून त्याचे आईवडिल सावित्री मानेकर, बंडू मानेकर यांच्यावर सेंट्रिंगने हल्ला करून जखमी केले होते. या घटनेची माहिती मिळताच रात्री गणेशने आपल्या साथीदारांना बोलावले. आरोपी गणेश आणि त्याच्या मित्रांनी मिळून पोहरवार यांच्या घरासमोरील वाहन क्रमांक एम. एच. ४९, आर-५४१३, एम. एच. ३१, सी. झेड-११६१, एम. एच. ४९ व्ही-००९१, पोहरवारचे भाडेकरूची एम. एच. ४९, व्ही-९२०१ आणि शेजारी शंकर रासुरकरची एम. एच. ३१, ३१७७ या वाहनांना आग लावली. फिर्यादी शालु पोहरवार यांच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.