शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 14:32 IST

ओंकार हजारे यांनी पक्षात संघटनात्मक कामावर भर देत तरुणांचे संघटन केले होते. स्थानिक परिसरात ओंकार यांना अण्णा नावाने ओळख होती

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचाअजित पवार गटाचा सरचिटणीस ओंकार हजारे यांचा मृतदेह रविवारी रात्री त्यांच्या घरासमोरील कारमध्ये पोलिसांना आढळला. ओंकार हजारेचे वय ३२ असून ते सोलापूरच्या पापय्या तालीम परिसरात राहायला होते. ओंकार हजारे यांच्या मृत्यूमुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 

ओंकार हजारे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. रविवारी दुपारी ते कारमध्ये बसले. त्यानंतर ते बाहेरच आले नाहीत. घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी कारच्या दरवाजातून डोकावून पाहिले असता ते सीटवर निपचित पडले होते. कारचा दरवाजा तोडून बेशुद्धावस्थेत त्यांना बाहेर काढले. उपचारासाठी हॉस्पिटलला नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

ओंकार हजारे यांनी पक्षात संघटनात्मक कामावर भर देत तरुणांचे संघटन केले होते. स्थानिक परिसरात ओंकार यांना अण्णा नावाने ओळख होती. मात्र त्यांच्या अकाली निधनाने सोलापूरने उगवते राजकीय नेतृत्व गमावले आहे. २०१९ साली ओंकार हजारेंचे लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात कुटुंबात आई वडील, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. मागील काही महिन्यांपासून ओंकार कौटुंबिक कारणामुळे नैराश्येत असल्याचे बोलले जाते. रविवारी ८ तारखेला त्यांच्या मेव्हण्याच्या लग्नाची पत्रिकाही मिळाली नव्हती असं निकटवर्तियांनी सांगितले.

नेमकं काय घडले?

८ जून रोजी सकाळपासून ओंकार हजारे कुणालाही न सांगता घराबाहेर पडले होते. खूप वेळ झाला तरी ते घरी न परतल्याने कुटुंबाला चिंता सतावू लागली. त्यानंतर घरच्यांनी, मित्रमंडळींनी त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला परंतु ते कुठेच सापडला नाही. अखेर घरासमोरील कारमध्ये ते सीटवर बसल्याचे दिसून आले. घरच्यांनी त्यांना आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला मात्र ओंकार यांनी काहीच प्रतिसाद देत नव्हता. मग काच तोडून दरवाजा उघडण्यात आला त्यावेळी ओंकार हजारे बेशुद्धावस्थेत असल्याचे दिसून आले. परंतु हॉस्पिटलला नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. सध्या या घटनेची पोलीस चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिस