शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

एनसीबीने माहीममधील फ्लॅटवर टाकला छापा, १३६ ग्रॅम एमडीसह तिघांना अटक 

By पूनम अपराज | Updated: February 2, 2021 21:54 IST

NCB Raid in Mahim : मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात एनसीबीच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा माहीममधील फ्लॅटवर छापा टाकला.

ठळक मुद्देघटनास्थळावरून ताब्यात घेतलेल्या तीन ड्रग पेडलर्सकडून एनसीबीची टीम वास्तविक अमली पदार्थ तस्करांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. अद्याप यासंदर्भात एनसीबीने अधिकृत माहिती दिली नाही.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) माहीममधील फ्लॅटवर छापा टाकला आणि १५ लाख रुपयांची एमडी (१३६ ग्रॅम) ड्रग्स जप्त केले आहे. एनसीबीने घटनास्थळावरून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तिघांची चौकशी सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात एनसीबीच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा माहीममधील फ्लॅटवर छापा टाकला. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम जवळचा आणि गँगस्टर करीमलालाचा नातेवाईक परवेझ खान उर्फ ​​चिंकू पठाण याच्या महत्वाच्या ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. घटनास्थळावरून ताब्यात घेतलेल्या तीन ड्रग पेडलर्सकडून एनसीबीची टीम वास्तविक अमली पदार्थ तस्करांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. अद्याप यासंदर्भात एनसीबीने अधिकृत माहिती दिली नाही.

NCB च्या जाळ्यात अडकला सर्वात मोठा मासा, 'Pablo of drug word' नावाने प्रसिद्ध

दाऊदच्या हस्तकाचे भिवंडीत सापडले कनेक्शन, ड्रग्स रॅकेटप्रकरणी सराफासह एकाला अटक 

मुंबईत चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूनंतर एनसीबीने अमली पदार्थ तस्कररांविरोधात कारवाई सुरु केली आहे. आतापर्यंत एनसीबीकडून ड्रग प्रकरणात फिल्म अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह 25 नामांकित व्यक्तींना अटक करण्यात आली आहे आणि डझनभर नामांकित व्यक्तींची चौकशी केली आहे. गेल्या आठवड्यात एनसीबीने दाऊद इब्राहिमचे खास परवेझ खान ऊर्फ चिंकू पठाण आणि आरिफ भुजवाला यांना अटक केली होती. चिंकू पठाणच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने माहीम येथे छापा टाकला आणि इतर अमली पदार्थ तस्करांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. 

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोraidधाडMumbaiमुंबईDrugsअमली पदार्थArrestअटकDawood Ibrahimदाऊद इब्राहिम