Dawood's aide's found in Bhiwandi, one arrested along with jweller in drug racket case | दाऊदच्या हस्तकाचे भिवंडीत सापडले कनेक्शन, ड्रग्स रॅकेटप्रकरणी सराफासह एकाला अटक 

दाऊदच्या हस्तकाचे भिवंडीत सापडले कनेक्शन, ड्रग्स रॅकेटप्रकरणी सराफासह एकाला अटक 

ठळक मुद्देसोन्याचा व्यावसायिक  विक्रांत उर्फ विकी जैन हा वर्मा आणि चिंकू पठाण यांना ड्रग्ससाठी  पैसे पुरवत असल्याचे समोर आले आहे.

सध्या मुंबईतील  चिंकू पठाणचे ड्रग्स रॅकेटच कनेक्शन उघड करण्यात एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांना यश येत असताना आता या ड्रग्स रॅकेटचे कनेक्शन भिवंडीत पोहचले आहे. भिवंडी शहरातील पद्मानगर भागात राहणाऱ्या  रोहित वर्मा याला अमली पदार्थ विक्री प्रकरणी एनसीबीच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने शनिवारी रात्री अटक केले असतानाच,  त्याला पैसे पुरवणारा सोन्याचा व्यावसायिक  विक्रांत उर्फ विकी जैन हा वर्मा आणि चिंकू पठाण यांना ड्रग्ससाठी  पैसे पुरवत असल्याचे समोर आले आहे. विक्रांत उर्फ विकी जैन राहत असलेल्या भिवंडीतील ब्राहण आळी परिसरातून त्याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने एनसीबीने ताब्यात घेतले आहे. चिंकू हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक आणि गँगस्टर करीम लालाचा नातेवाईक आहे. 

भाजी विक्रेता असलेल्या कुटुंबातील राहुल वर्मा हा युवक मागील वर्ष दोन वर्षा पासून या व्यवसायात असल्याचे व त्याचे हितसंबंध भिवंडी सह ठाणे मुंबई या भागात ही असल्याचे बोलले जात असून मागील वर्षभरात राहुल वर्माने मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल या व्यवसायात करीत असून त्याला पैसे पुरवणारा सोन्याचा व्यावसायिक विक्रांत उर्फ विकी जैन हा रोहित वर्मा आणि चिंकू पठाण यांना ड्रग्स साठी पैसे पुरवत असल्याचे एनसीबीने त्यांना अटक केली.

      हिंदी चित्रपटातील हिरो आणि हिरोइन यांना ड्रग्स पुरवणाऱ्या चिंकू पठाण याच्या पुण्यातील जोडीदाराच्या घरावर एनसीबीच्या पथकाने छापेमारी केली.  विशेष म्हणजे तीन दिवसापूर्वीच चिकू पठाण एनसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तर  गेल्या काही महिन्यांपासून  अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांच्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. याच कारवाईदरम्यान, एनसीबीने गँगस्टर चिंकू पठाणला अटक केली. त्यानेच भिवंडीतील विक्की जैनचे नाव सांगितले असून त्याच्याकडे सापडलेल्या डायरीमधून धक्कादायक माहिती समोर आली आल्याचे सांगण्यात येत आहे. 

Web Title: Dawood's aide's found in Bhiwandi, one arrested along with jweller in drug racket case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.