अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक, गँगस्टर करीम लालाच्या नातेवाईकाला NCB ने ठोकल्या बेड्या
By पूनम अपराज | Updated: January 20, 2021 21:02 IST2021-01-20T21:00:21+5:302021-01-20T21:02:45+5:30
Chiku pathan Arrested by NCB : चिंकू पठाणकडून एनसीबीने एमडी ड्रग्स जप्त केले आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक, गँगस्टर करीम लालाच्या नातेवाईकाला NCB ने ठोकल्या बेड्या
एनसीबीने मोठी कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि गँगस्टर करीम लालचा नातेवाईक चिंकू पठाणला बेड्या ठोकल्या आहे. एनसीबी गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मोठ्या कारवाया करत आहे. याच कारवाईदरम्यान, एनसीबीने गँगस्टर चिंकू पठाणला अटक केली आहे. त्याला नवी मुंबईतील घणसोली येथून अटक करण्यात आली आहे.
एनसीबीची ही मोठी कामगिरी मानली जात आहे. चिंकू पठाण हा गँगस्टर करीम लालाचा खास हस्तक असून नातेवाईकही आहे. महत्वाचे म्हणजे तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा देखील हस्तक असल्याची NCB ची माहिती आहे. चिंकू पठाणकडून एनसीबीने एमडी ड्रग्स जप्त केले आहे. त्याला अटक केल्यानंतर ड्रग्ज तस्कारांना मोठा धसका घेतला आहे.