नक्षलवाद्यांची छावणी पोलिसांनी केली उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 22:16 IST2020-03-04T22:15:42+5:302020-03-04T22:16:39+5:30
घटनास्थळावरुन पोलिसांनी आयईडी, सुरुंग आणि इतर बेकायदेशीर सामग्री जप्त केली.

नक्षलवाद्यांची छावणी पोलिसांनी केली उद्ध्वस्त
गडचिरोली - कुरखेडा येथे सी - 60 जवानांनी आज नक्षल छावणी नष्ट केली. मात्र, ७०-८० नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला.
नक्षलवाद्यांनी भरवलेल्या कॅम्पमध्ये उपस्थित सुमारे 70-80 नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. तरीदेखील घटनास्थळावरुन पोलिसांनी आयईडी, भूसुरूंग आणि इतर बेकायदेशीर सामग्री जप्त केली.
दुसरीकडे, गेल्यावर्षी १ मे रोजी नक्षलवाद्यांनी ३६ वाहनांची जाळपोळ करून भीषण भूसुरूंग स्फोट घडविला होता, त्या घटनेतील तीन सूत्रधारांपैकी एक असलेला जहाल नक्षलवादी दिनकर गोटा आणि त्याची पत्नी सुनंदा यांना पोलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी (दि.४) अटक केली. दिनकर हा उत्तर गडचिरोली आणि कोरची दलमच्या विभागीय समितीचा सदस्य आहे. त्याच्यावर १६ लाख तर कोरची दलमची सदस्य असलेली त्याची पत्नी सुनंदा हिच्यावर २ लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते. त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.