Naxal firing injures one in Gadchiroli during lockdown pda | लॉकडाऊनदरम्यान गडचिरोलीत नक्षल चकमकीत एक जवान जखमी 

लॉकडाऊनदरम्यान गडचिरोलीत नक्षल चकमकीत एक जवान जखमी 

ठळक मुद्देपोलीस-नक्षल चकमकीत केद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) जवान जखमी झाला. सीआरपीएफ 192 बटालियनची एक तुकडी रेखाटोला जंगल परिसरात नक्षल विरोधीअभियान राबवित असताना सदर तुकडीवर नक्षल्यांनी गोळीबार केला.

धानोरा (गडचिरोली) : धानोरा तालुक्याच्या कारवाफा पोलीस मदत केंद्राअंतर्गत रेखाटोला जंगल परिसरात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत केद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) जवान जखमी झाला.

मंगळवारी मध्यरात्री 12 ते 1 वाजताच्या सुमारास सीआरपीएफ 192 बटालियनच्या जवानांची टीम व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला. त्याला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. एम.रवी असे जखमी जवानाचे नाव आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर सीआरपीएफ 192 बटालियनची एक तुकडी रेखाटोला जंगल परिसरात नक्षल विरोधीअभियान राबवित असताना सदर तुकडीवर नक्षल्यांनी गोळीबार केला. सीआरपीएफ जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.

Web Title: Naxal firing injures one in Gadchiroli during lockdown pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.