Navy personnel Akhilesh Yadav shot himself yesterday | नौदलाच्या जवानाची स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या

नौदलाच्या जवानाची स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या

मुंबई -  भारतीय नौदलामध्ये कार्यरत असलेल्या जवानाने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली ही घटना गुरुवारी घडली. अखिलेश लालजी यादव असे आत्महत्या करणाऱ्या जवानाचे नाव असून, ते कुलाबा येथे आयएनएस आंग्रे या युद्धनौकेवर तैनात होते.

नौलदामध्ये सी/1 नाईक पदावर कार्यरत असलेल्या अखिलेश लालजी यादव यांनी स्वत:कडील इन्सास रायफलमधून हनुवटीच्या खालच्या बाजूने स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. त्यानंतर त्यांना कुलाबा येथील अश्विनी हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: Navy personnel Akhilesh Yadav shot himself yesterday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.