पनवेल - मस्ती करते म्हणून चिमुरडीला आईनेच मेणबत्तीचे चटके दिल्याची धक्कादायक घटना कळंबोलीत बुधवारी उघडकीस आली आहे. ही मुलगी अवघ्या पाच वर्षांची असून तिच्या वडिलांनी कळंबोली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी या प्रकरणी आई व काकूला बुधवारी रात्री अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची रवानगी कल्याण येथील आधारवाडी जेलमध्ये करण्यात आली. कळंबोली सेक्टर १४ येथे पाच वर्षांची मुलगी आईवडिलांसह राहते. मात्र, घरात सतत मस्ती करते म्हणून तिच्या आईनेच तिला मेणबत्तीचे चटके दिले. यासाठी तिच्या काकूने तिला मदत केल्याचे मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे.मुलीच्या वडिलांनी कळंबोली पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला सारा प्रकार कथन केला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी आई व काकूविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघींना अटक करण्यात आली आहे.
मस्ती करते म्हणून चिमुरडीला मेणबत्तीने चटके
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 06:27 IST