शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

भिवंडीतील नारपोली पोलिसांनी आवळल्या सात आरोपींच्या मुसक्या

By नितीन पंडित | Updated: September 5, 2022 14:25 IST

नारपोली पोलिसांनी केलेल्या या कामगिरी मुळे सहा गुन्ह्यांची उकल करत गुन्हेगारांना जरब बसविण्यात यश मिळविले आहे.

भिवंडी :  भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी, मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी शहरातील पोलीस ठाणे हददीत सतर्क राहून गस्त घालण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले व नारपोली पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरिक्षक मदन बल्लाळ यांच्यामार्गदर्शना खाली पोलीस पथकाने तब्बल सात सराईत आरोपींच्या मुसक्या आवळत चेन व मोबाईल स्नाचिंग सह घरफोडी,वाहन चोरीच्या सहा गुन्ह्याचा छडा लावीत ४ लाख ९२ हजार ६९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती नारपोली पोलोसांनी दिली आहे.

नारपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील सहायक पोलीस उप निरीक्षक अनिल धिवार, पोहवा जयराम सातपुते, हरिष हाके, सुशिल इथापे, समीर ठाकरे, नंदकिशोर सोनगिरे, पोना संदीप जाधव, सागर म्हात्रे, राजेश पाटील, पोशि जनार्दन बंडगर, ताटे या पथकाने सिसिटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करून आसिफ मलिक बागवान (वय २३, रा. नवीवस्ती), अकबर शौकत शेख (वय २४, रा. निजामपुरा) यांच्या ताब्यातून ७२ हजार रुपये किमतीचे सहा महागडे मोबाईल, बैजनाथ भगवती प्रसाद वर्मा (वय ४७, रा.अंजुरफाटा), गौरी शंकर पुजारी आरक (वय ३०, रा.अंजुरफाटा) यांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून २९८ किलो वजनाच्या अल्युमिनियम प्लेट्स, कॉपरचे पॉलिकॅब रोल व गुन्ह्यात वापरलेली टेम्पो असा असा दोन गुन्ह्यातील २ लाख ५५ हजार ६१९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गुलजार हुसैन अफताउद्दीन खान (वय २२, रा. वडपे) याच्या ताब्यातून चोरीची ६० हजार रुपयांची रिक्षा ताब्यात घेण्यात आली.तर इरफान जहाँगिर शेख (वय १९, रा. रोशनबाग), आबीद अकम अंसारी (वय २४, रा. माधवनगर) यांना मोबाईल व चैन स्नाचिंगच्या दोन गुन्ह्यात ताब्यात घेत त्यांच्या जवळून १ लाख ५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नारपोली पोलिसांनी केलेल्या या कामगिरी मुळे सहा गुन्ह्यांची उकल करत गुन्हेगारांना जरब बसविण्यात यश मिळविले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी