नार्कोटिक्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांची हरमल येथे कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 23:13 IST2021-04-30T23:12:43+5:302021-04-30T23:13:11+5:30
मोठ्या किमतीचे ड्रग्स जप्त

नार्कोटिक्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांची हरमल येथे कारवाई
पणजी : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबईच्या अधिकाऱ्यांनी गोव्यात हरमल किनाऱ्यावर एका शॅकमध्ये धडक कारवाईत मोठ्या किमतीचा अंमली पदार्थसांठा जप्त केला आहे. ड्रग माफिया मात्र अधिकार्यांच्या हातून निसटला.
अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी नार्कोटिक ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत अनेक ड्रग पेडलरना अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वीही मुंबईत अटकसत्र झाले होते. त्यानंतर नारकोटिक्स ब्युरोचे अधिकारी गोव्यात दाखल झाले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई चालू होती मात्र त्याबाबत अतिशय गुप्तता बाळगण्यात आली