नराधम बाप! पोटच्या ९ वर्षाच्या मुलीवर अनेकदा बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 19:10 IST2020-08-29T19:09:20+5:302020-08-29T19:10:07+5:30

उत्तन भागात राहणाऱ्या एका  २० वर्षीय तरुणीच्या  फिर्यादीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बाप हा फिर्यादी तरुणीच्या वडिलांच्या परिचित आहे.

Naradham Baap! 9-year-old girl raped; arrested by Uttan Sagari police | नराधम बाप! पोटच्या ९ वर्षाच्या मुलीवर अनेकदा बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नराधम बाप! पोटच्या ९ वर्षाच्या मुलीवर अनेकदा बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन भागात एका ३२ वर्षीय बापाने त्याच्या ९ वर्षांच्या मुलीवरच अनेकवेळा बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.  उत्तन सागरी पोलीस ठाण्यात बापा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या नराधम बापास अटक केली असून त्याला ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

उत्तन भागात राहणाऱ्या एका  २० वर्षीय तरुणीच्या  फिर्यादीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बाप हा फिर्यादी तरुणीच्या वडिलांच्या परिचित आहे. आरोपी हा पत्नी व तीन लहान मुलींसह उत्तन भागात राहतो. त्याची ९ वर्षांची लहान मुलगी ही या तरुणीच्या घरी नेहमी येत जात असे. 

पण गेल्या काही दिवसांपासून ती लहान मुलगी नेहमी प्रमाणे बोलत नव्हती. तसेच त्रस्त दिसत होती. यामुळे तरुणीने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्या मुलीने बापाने कसे लैंगिक अत्याचार केले हे सांगितल्याने तरुणीला धक्काच बसला. तसेच कोणाला सांगशील तर चाकूने मारण्याची बापाने धमकी दिली होती. 

अखेर तरुणीनेच पोलिसात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी पीडित मुलीच्या बापास बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम  व अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने उत्तन भागात खळबळ उडाली असून संताप व्यक्त होत आहे. 

 

Web Title: Naradham Baap! 9-year-old girl raped; arrested by Uttan Sagari police