मानेला मसाजच्या नावाखाली आईबाईचे मंगळसूत्र लंपास करणारी दुकली अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 19:50 IST2019-05-25T19:47:20+5:302019-05-25T19:50:42+5:30
आग्रीपाडा पोलिसांनी केली कारवाई

मानेला मसाजच्या नावाखाली आईबाईचे मंगळसूत्र लंपास करणारी दुकली अटकेत
मुंबई - मानेला मसाज करून देण्याच्या नावाखाली गळ्यातील मौल्यवान दागिने चोरी करणाऱ्या दोन महिलांंना आग्रीपाडा पोलिसांनीअटक केली आहे. अश्विनी बोरसे (५०), अनुसया मोरे (६२) अशी अटक केलेल्या दोन महिलांची नावे आहेत. या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस अधिक तपास करत आहे.
सातरस्ता परिसरात राहणाऱ्या तक्रारदार छाया हरी नवले यांची आई रुक्मिणी पवार (९०) या त्यांच्या सातरस्ता परिसरातील घरासमोर बसलेल्या असताना शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दोन महिला त्यांच्याकडे आल्या. त्यांनी रुक्मिणी पवार यांना त्यांच्या मानेला मसाज करून देतो असं सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. दोघींनी मसाज करताना रुक्मिणी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पळ काढला. या प्रकरणी छाया नवले यांनी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी या महिलांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. आश्विनी अशोक बोरसे ही मरीअम्मा झोपडपट्टी, जीजामाता, वरळी येथे राहते आणि अनुसया शंकर मोरे ही महिला महाराष्ट्र नगर, बांद्रा येथे राहते. दोघांनी अशा प्रकारे अनेकांंना लुटले असल्याची माहिती पुढे आली आहे.