शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नालासोपारा घातपात कटप्रकरणाची व्याप्ती वाढली; राज्यभरातून 12 जणांची धरपकड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 14:08 IST

मुंबईसह नालासोपारा, पुणे, सातारा, सोलापूरमध्ये धरपकड सुरु; सनातनच्या वकिलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई/नालासोपारा : हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित वैभव राऊत कडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त केल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने पुण्यातून काल संध्याकाळी दोघांना अटक केली होती. या प्रकरणाची व्याप्ती आज वाढली असून सकाळी केलेल्या कारवाईत पुण्यातून आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर राज्यभरातून एकूण 12 जणांना एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस)ही कारवाई करत, राज्यात सणासुदीच्या दिवसात घातपात घडवून आणण्याचा मोठा कट उधळून लावला. कालच्या कारवाईमध्ये वैभव राऊत, शरद कळसकर व सुधन्वा गोंधळेकर या हिंदुत्वावादी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. 

 संशयित आरोपी मुंबईसह नालासोपारा, पुणे, सातारा, सोलापूर या ठिकाणी बॉम्बस्फोट किंवा घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत होते, अशी शक्यता एटीएसने व्यक्त केली आहे. या जिल्हांमध्ये आज कारवाई करण्यात आली. यामध्ये 12 जणांना चौैकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. 

न्यायालयाने राऊतसह तिघांना १८ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडीत पाठविले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भातही या तिघांची चौकशी होणार आहे.

कसा आला संशय?सनातनच्या पनवेलजवळच्या आश्रमावर गुप्तचरांची पाळत होती. तेथे कोण येते, किती वेळ थांबते, सोबत येताना कोण येते, जाताना कोणासोबत जाते, कोण थांबते, किती वेळ थांबते याची माहिती घेताघेता वैभव राऊतचा सनातनच्या या आश्रमातील वावर ठळकपणे लक्षात आला. त्यातूनच पुढे त्याच्या बंगल्यावर पाळत ठेवण्यात आली. तेव्हा रात्रीच्या वेळी अनेक व्यक्ती त्याच्या बंगल्यावर येतात. बराच वेळ थांबतात आणि मध्यरात्री किंवा पहाटे बाहेर पडतात, असे आढळून आले. त्यामुळे त्याच्यावरील संशय वाढत गेला. त्यातूनच त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला.

 

सनातनच्या वकिलांचे मुख्यमंत्र्यांना पत्रसनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी वैभव राऊत सह इतरांच्या झालेल्या अटकेप्रकरणी एटीएसवर गंभीर आरोप केले आहेत. यासंबंधीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिवले आहे. या पत्रात एटीएस या युवकांचा छळ करत आहे. मालेगाव सारखा प्रकार या युवकांच्या बाबतीत होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेSolapurसोलापूरAnti Terrorist Squadदहशतवाद विरोधी पथक