उद्या नालासोपाऱ्यात वैभवच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 21:07 IST2018-08-16T21:06:34+5:302018-08-16T21:07:18+5:30
भंडारअळीतीळ अनंत राऊत सभागृह ते पंचमुखी हनुमान मंदिरापर्यंत असेल हा मोर्चा

उद्या नालासोपाऱ्यात वैभवच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा
नालासोपारा - वैभव राऊतच्या समर्थनार्थ वसईत मोठ्या प्रमाणात सह्यांची मोहिम हाती घेण्यात आली. त्यानंतर उद्या सायंकाळी ४. ३० ते ५. ३० या दरम्यान भंडारअळी गावातील अनंत राऊत सभागृह ते पंचमुख हनुमान मंदिरापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती गावकरी हर्षद राऊत यांनी दिली. स्थानिक पोलिसांनी या मोर्चासाठी परवानगी देखील दिली असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
डहाणू ते अलिबागपर्यंतच्या त्याच्या शेषवंशीय क्षत्रीय समाजातील समाज बांधव या मोर्चासाठी मोठ्या संख्येने नालासोपारा येथे जमणार आहेत. या मोर्चासाठी नालासोपारा पोलीस ठाण्यात लेखी परवानगी मागण्यात आली होती. मात्र, आज या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. वसईतील विविध संघटनांचा पाठींबा उद्याच्या मोर्चाला असून अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदीवडेकर यांनीही पाठींबा दर्शविला आहे. त्यांनी वैभव राऊत राहत असलेल्या भंडारआळी गावात येऊन आपला पाठिंबा दर्शविला.