शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला सासरी जाताना बघू शकला नाही माथेफिरू प्रियकर, रस्त्यात अडवून झाडली तिच्यावर गोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 11:01 IST

दोघांनाही नंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तरूणीला मृत घोषित करण्यात आलं. तर तरूणाची स्थिती गंभीर होती. नंतर त्याचाही मृत्यू झाला.

नालंदा जिल्ह्यातील एका माथेफिरू रोडरोमिओने आपल्या प्रेयसीची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नालंदा जिल्ह्यातील रहुई भागाती आहे. आपल्या माहेरून सासरी जात असलेल्या नवविवाहितेला त्याने रस्त्यात अडवलं आणि तिच्यावर गोळी झाडली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोघांनाही नंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तरूणीला मृत घोषित करण्यात आलं. तर तरूणाची स्थिती गंभीर होती. नंतर त्याचाही मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्टनुसार, तरूणीचं लग्न चार दिवसांआधी २६ मे रोजी शाहपूर गावात झालं होतं. ती लग्नानंतर तिच्या सासरी जात होती. यादरम्यान माथेफिरू प्रियकराने तिला रस्त्यात अडवून तिची हत्या केली. माहिती मिळताच डीएसपी संजय कुमार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तरूणाची बाईक आणि हत्येसाठी वापरलेली पिस्तुल ताब्यात घेतली.  (हे पण वाचा : प्रेमात धोका मिळाला म्हणून प्रियकरानं प्रेयसीचा काटाच काढला; हत्येचा ‘असा’ रचला कट, पोलिसही चक्रावले)

इकडे पती पत्नीला सासरी घेऊन जात होता. याची माहिती तिच्या प्रियकराला लागली. त्यानंतर माथेफिरू प्रियकर बाईकने स्कार्पिओ गाडीचा पाठलाग करत गेला. तो एका पुलाजवळ ओव्हरटेक करून गाडीसमोर थांबला. आधी त्याने प्रेयसीवर गोळी झाडली त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेतली. 

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तरूणीच्या हातावरील मेहंदीचा रंगही उतरला नव्हता की, माथेफिरू प्रियकराने प्रेयसीचा जीव घेतला. सुदैवाने या माथेफिरू प्रियकराने प्रेयसीच्या पतीला जिवंत सोडलं.  (हे पण वाचा : स्वत:च्याच घरात फोनवर बोलत होती महिला; पोलिसांनी 27 हजारांचा दंड केला)

मीडिया रिपोर्टनुसार, माथेफिरू प्रेमी आणि नवविवाहित तरूणीचं अनेक वर्षापासून प्रेमप्रकरण सुरू होतं. पण कुटुंबियांनी मुलीचं लग्न २६ मे रोजी विकास कुमार नावाच्या तरूणासोबत करून दिलं. हीच बाब माथेफिरू प्रियकराला सहन झाली नाही. त्याने रागाच्या भरात हे धक्कादायक कृत्य केलं. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न