लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने गुरुवारी अडीच कोटी रुपयावर अपसंपदा प्रकरणात डॉ. प्रवीण मधुकर गंटावार व डॉ. शिलू प्रवीण गंटावार यांना प्रत्येकी एक लाख रुपयाचे वैयक्तिक बंधपत्र व तेवढ्याच रकमेचे सक्षम जामीनदार सादर करण्याच्या अटीवर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच, राज्य सरकारला नोटीस बजावून यावर ८ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.प्रकरणावर न्या. अमोल हरणे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २३ जुलै २०१४ रोजी मडावी नामक व्यक्तीने गंटावार दाम्पत्याकडील अपसंपदेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर २०१५ मध्ये गंटावार दाम्पत्याकडील संपत्तीची चौकशी सुरू करण्यात आली. त्या चौकशीच्या आधारावर १ जुलै रोजी सीताबर्डी पोलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (ए)(बी) अंतर्गत गंटावार दाम्पत्याविरुद्ध एफआयआर नोंदवला. त्यामुळे गंटावार दाम्पत्याने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. डॉ. प्रवीण खासगी रुग्णालय चालवीत असून डॉ. शिलू या महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहेत.
नागपूर सत्र न्यायालय : गंटावार दाम्पत्याला तात्पुरता जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 20:40 IST
सत्र न्यायालयाने गुरुवारी अडीच कोटी रुपयावर अपसंपदा प्रकरणात डॉ. प्रवीण मधुकर गंटावार व डॉ. शिलू प्रवीण गंटावार यांना प्रत्येकी एक लाख रुपयाचे वैयक्तिक बंधपत्र व तेवढ्याच रकमेचे सक्षम जामीनदार सादर करण्याच्या अटीवर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला.
नागपूर सत्र न्यायालय : गंटावार दाम्पत्याला तात्पुरता जामीन
ठळक मुद्देराज्य सरकारला नोटीस