Nagpur Breaking: कन्हान नदीमध्ये पाच तरुण बुडाले 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 11:47 AM2021-09-05T11:47:50+5:302021-09-05T11:52:48+5:30

Nagpur News: गेल्या काही तासांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. हे तरुण येथील दर्ग्यात दर्शनासाठी आले होते.

Nagpur Breaking: Five youths drowned in Kanhan river | Nagpur Breaking: कन्हान नदीमध्ये पाच तरुण बुडाले 

Nagpur Breaking: कन्हान नदीमध्ये पाच तरुण बुडाले 

Next

नागपूर :  नागपूर नजीकच्या अम्मा का दर्गा परीसरात कन्हान नदीत 5 तरुण बुडाले आहेत. रविवारी सकाळी 9.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.  ( Five youths drowned in Kanhan river in Nagpur.)

सैय्यद अरबाज उर्फ लकी ( 22 ) , अयाज बेग हफीज बेग ( 20 ) , मो. अबुजर मो. अल्ताफ़ बेग ( 18 ) , मो. सप्तहिन मो. इकबाल शेख ( 21 ) , ख्वाजा बेग तब्बुसर ( 17 ) सर्व रा. दिग्रस जि. यवतमाळ अशी या तरुणांची नावे आहेत. ते कन्हान येथील अम्मा का दर्ग्यात दर्शनासाठी आले होते. यानंतर पाचही तरुण नजीकच्या कन्हान नदी पात्रात पोहायला उतरले व बुडाले.

वाहून गेल्याने त्यांचे शोधकार्य सुरू आहे. बचाव पथकाला बुडालेल्या पैकी अद्याप कुणीही सापडलेला नाही. पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे ते पुढे वाहून गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Nagpur Breaking: Five youths drowned in Kanhan river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app