शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

नागिन २ मधील अभिनेत्री चाहत पांडेला अटक; मामाच्या घरामध्ये केला 'तमाशा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 11:19 IST

दमोह जिल्ह्यातीन कोतवाली पोलिसांनी चाहत पांडेसह तिची आई आणि अल्पवयीन दोन भावांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. चाहतच्या आईने आठवड्याभरापूर्वी भावाच्या घरी जाऊन शिवीगाळ करत धमकी दिली होती.

दमोह : नागिन 2 , सावधान इंडियासारख्या टीव्ही सिरिअलमध्ये काम केलेली टीव्ही कलाकार चाहतमणि पांडेसह (tv actress chahat pandey arrested) तिच्या आईला मध्य प्रदेशपोलिसांनीअटक केली आहे. कौटुंबिक हिंसेचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. मामाच्या घरामध्ये घुसून तोडफोड आणि मारहाण केली आहे. दमोह पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना कोठडीमध्ये पाठविण्यात आले आहे. 

दमोह जिल्ह्यातीन कोतवाली पोलिसांनी चाहत पांडेसह तिची आई आणि अल्पवयीन दोन भावांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. चाहतच्या आईने आठवड्याभरापूर्वी भावाच्या घरी जाऊन शिवीगाळ करत धमकी दिली होती. यानंतर पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. यानंतर चाहत आणि तिची आई फरार झाले होते. मंगळवारी रात्री पुन्हा चाहत आणि तिच्या आईसह दोन भावांनी मामाच्या घरात घुसखोरी केली. बुधवारी पोलिसांनी दोघांना अटक केली. 

पोलिसांनुसार ही घटना मंगवारी रात्रीची आहे, अभिनेत्री चाहत पांडे आणि तिची आई व दोन भावांनी मामा तनुश पराशर यांच्या घरात घुसून मामासह मामीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याचबरोबर तोडफोड केली. चाहतने सीसीटीव्ही कॅमेराही फोडला. मात्र, ही घटना मामाने मोबाईल कॅमेरामध्ये कैद केली आहे. पोलिसांनी हा पुरावा दिल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. 

काय आहे वाद?चाहत पांडेच्या मामाला अपत्य नाही. यामुळे त्यांनी एका मुलाला दत्तक घेतले आहे. चाहतच्या आईला तिच्याच मुलाला दत्तक घ्यावे असे वाटत आहे. यामुळे ती भावावर दबाव टाकत होती. मात्र, भावाने दुसराच मुलगा दत्तक घेतल्याने तिने धमक्या देण्यास सुरुवात केली होती. कारण दुसऱ्या मुलाला दत्तक घेतल्यावर भावाची सारी मालमत्ता त्याची होणार आहे. 

कोण आहे चाहत पांडे?चाहत पांडे ही टीव्ही कलाकार आहे. तिने तेनालीराम, राधाकृष्ण, सावधान इंडिया आणि नागिन २ या प्रसिद्ध सिरिअलमध्ये काम केले आहे. लॉकडाऊनमुळे ती दमोहच्या घरी गेली आहे. काही दिवसांपूर्वी चाहत तिचा मित्र हीर चोप्रासोबतच्या वादामुळे चर्चेत आली होती. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

काँग्रेसचे नाराज मंत्री आज मुख्यमंत्र्यांना भेटणार; खदखद व्यक्त करणार

India China Face Off: ओप्पोने घेतला 'बायकॉट'चा धसका; Find X2 चे लाईव्ह लाँचिंगच केले रद्द

India China Face Off: चीनच्या वर्मावरच बोट; केंद्र सरकार टेलिकॉम उपकरणांचे मोठे कंत्राट रद्द करणार

यंदा मला जिंकवा! डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितली चीनकडे मदत

Sushant Singh Rajput Suicide: सलमान खान, करण जोहरसह ८ जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल

घरातच काढलेत! हे भन्नाट फोटो पहाल तर चक्कर येऊन पडाल

टॅग्स :Naagin 3 Serialनागिन 3TV Celebritiesटिव्ही कलाकारPoliceपोलिसArrestअटकMadhya Pradeshमध्य प्रदेश