वृद्धेच्या हत्येचे गूढ उलगडेना; मालमत्ता वाद की चोरीचा होता आरोपीचा उद्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 09:10 PM2021-11-01T21:10:34+5:302021-11-01T21:11:44+5:30

Crime News : ही हत्या शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या आत झाल्याची दाट शक्यता पोलिसांनी प्रथमिक वैद्यकीय अहवालानंतर व्यकत केली.

The mystery of the old man's murder was not solved; The purpose of the defendant's property dispute was theft | वृद्धेच्या हत्येचे गूढ उलगडेना; मालमत्ता वाद की चोरीचा होता आरोपीचा उद्देश

वृद्धेच्या हत्येचे गूढ उलगडेना; मालमत्ता वाद की चोरीचा होता आरोपीचा उद्देश

Next

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील उभाबाजार परिसरात राहात असलेल्या दोन वृध्द महिलांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नसून ही हत्या मालमत्ता वादातून झाली की चोरीच्या उद्देशाने झाली यांचेच गुढ उलगडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नसून,पोलिस मृत नीलिमा खानविलकर व शालिनी सावंत या वृध्देच्या संबधित ओळखीच्या लोकांची चौकशी करत असून अद्यापपर्यंत कुठलेच धागेदोर मिळाले नाहीत. दरम्यान ही हत्या शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या आत झाल्याची दाट शक्यता पोलिसांनी प्रथमिक वैद्यकीय अहवालानंतर व्यकत केली.


सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथील नीलिमा खानविलकर व शालिनी सावंंत या दोन वृध्द महिलांची शनिवारी रात्रीच्या सुमारास निर्घण हत्या करण्यात आली.  हा प्रकार रविवारी उघडकीस आल्यानंंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.हत्या ही तीक्ष्ण हत्यारांने केल्याचे पोलिसांचे म्हणने असून,प्रथम दर्शनी मालमत्ता वादावरून हत्या झाल्याचे पोलिसां नी सांगितले पण सोमवारी दिवसभर पोलिसांंनी सर्व घटनाचा तपास केला यात मालमत्तेबाबत माहीती घेतली मात्र यात कुठेही मालमत्ता वादाची किनार आढळून आली नाही.नीलिमा खानविलकर यांचा भाचा नंदू पाट्ये यांनी सबधित कागदपत्रे पोलिसांना दाखवली असून,या सध्यातरी कुठे ही मालमत्ता वाद दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.


दरम्यान रविवारी रात्री उशिरा नीलिमा खानविलकर यांच्या गळ्यातील एक चेन चोरीला गेल्याचे सांगण्यात येत असून,ही हत्ये मागे चोरीचा उद्देश होता का?हे आता पोलिस तपासणार आहेत.त्यामुळे ही हत्या चोरीच्या उद्देशाने कि मालमत्ता वादातून झाली यांचेच कोडे पोलिसांना उलगड ताना दिसत नाही.तर दुसरी कडे पोलिसांंनी रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अनेकांची चौकशी केली असून,घटनास्थळी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले होते.हे श्वान उभाबाजार पासून माठेवाडा येथून पुन्हा शिवाजी पुतळा असे करत पुन्हा श्वान घटनास्थळी घुटमळले होते.त्यामुळे पोलिस या मार्गावरील सर्व सीसीटिव्हीचा शोध घेत आहे.


आता पर्यत अनेक सीसीटिव्ही पुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून,हे सीसीटिव्ही फुटेज मध्ये कोण संशयास्पद व्यक्ती दिसते काय यांची पोेलि स माहीती घेणार आहेत.तसेच या दोन्ही हत्या एका सराईत गुन्हेगारा प्रमाणे केल्या असल्याने पोलिस ही चांगलेच चक्रावून गेले असून,या गुन्हयाच्या तपासासाठी सावंतवाडी पोेलिसां बरोबर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक तसचे मुख्यालयातील अतिरिक्त पोलिस बळ काम करत आहेत.त्यामुळे या गुन्हयाचा झडा लवकरच लागेल असा विश्वास पोलिस व्यकत करत आहेत.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे सावंतवाडीत ठाण
रविवारी स्वता पोलिस अधीक्षक सावंतवाडीत ठाण माडून होते तर सोमवारी अप्पर पोेलिस अधीक्षक नितीन बगाटे हे सावंतवाडीत ठाण माडून असून, या गुन्हयाचा कसून तपास करत आहेत.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरिक्षक सुनिल धनावडे यांच्यासह पोलिस उपअधीक्षक नितीन काटेकर,शंंकर कोरे यांच्याकडे माहीती घेत असून रात्री उशिरा पर्यत पोलिसांंची बैठक सुरू होती.

Web Title: The mystery of the old man's murder was not solved; The purpose of the defendant's property dispute was theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.