शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

मृतदेहाचे गूढ उकलले, आईच्या सांगण्यावरून मुलाची गळा चिरून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 20:41 IST

दोघांना अटक; सातारा तालुका डीबी पथकाची कारवाई

ठळक मुद्देसंबंधित युवकाचा खून झाला असून, हा खून आईच्या सांगण्यावरून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे. ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली.

सातारा : शहरालगत असणाऱ्या खिंडवाडीतील जंगलामध्ये आढळून आलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले असून, केवळ दोन तासांतच सातारा तालुका पोलिसांच्या डीबी पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. संबंधित युवकाचा खून झाला असून, हा खून आईच्या सांगण्यावरून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे. ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली.

याबाबत अधिक माहिती अशी, खिंडवाडीतील जंगलामध्ये बुधवारी दुपारी एका युवकाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळून आला. या युवकाच्या डोक्याजवळ दगड आणि रक्त दिसून आले. त्यामुळे त्याचा खून झाला असावा, या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले. सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक माहिती उघड झाली.  प्रकाश कदम (वय ३०, रा. वळसे, ता. सातारा) असे खून झालेल्या युवकाचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी केवळ दोन तासांत संशयित आरोपी साहिल मुलाणी आणि प्रमोद साळुंखे (रा. देगाव, ता. सातारा) या दोघांनाही अटक केली. या दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चक्रावून टाकणारी माहिती पोलिसांना दिली. प्रकाश कदम हा दारू पिऊन वारंवार त्याच्या आईला त्रास देत होता. काही वर्षे तो मुंबईमध्ये काम करत होता. मात्र, गावी आल्यानंतर तो परत जात नसे. गावी काहीही काम न करत तो दारू पिऊन आईला शिवीगाळ करत होता. या त्रासाला त्याची आई कंटाळली होती. त्यामुळे आईने नात्यातील प्रमोद साळुंखे याला त्याचा कायमचा काटा काढण्याचे सांगितले. त्यानुसार प्रमोदने त्याचा मित्र साहिल याला सोबत घेतले. २६ आॅगस्ट रोजी दुपारी तिघेजण दारू पिण्यासाठी खिंडवाडीतील जंगलामध्ये गेले. या ठिकाणी प्रकाशला दारू पाजल्यानंतर दोघांनी प्रकाशचा गळा चिरला. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा निघृर्ण खून केला असल्याचे तपासात समोर आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुजित भोसले, दादा परिहार, सागर निकम, नितीनराज थोरात, सतीश पवार, संदीप कुंभार यांनी केली.आई सुद्धा ताब्यातमुलाच्या खुनाची सुपारी देणाऱ्या आईलाही पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. तिच्याकडे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू होती. या प्रकरणातील आणखी वस्तूस्थिती गुरुवारी दुपारपर्यंत समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

 

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

 

सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर

टॅग्स :MurderखूनArrestअटकPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर