उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील एका घरातील रहस्यमय मृत्यूचं गूढ उकलले आहे. या घरात राहणाऱ्या ३ जणांचा मागील ८ वर्षात एक एक करून मृत्यू झाला. परंतु आता या मृत्यूमागचं खरे सत्य समोर आले आहे. कोट्यवधी रूपयांच्या लालसेपोटी झालेल्या या धक्कादायक प्रकाराने सगळेच हैराण झाले आहेत.
या घरात २०१७ साली पहिल्यांदा एकाचा मृत्यू झाला. या घरातील प्रभादेवी तिचा मुलगा विशाल सिंघलसोबत दुचाकीवरून जात होती. रस्त्यात एका अज्ञात वाहनाने तिला धडक दिली. या अपघातात प्रभादेवी यांचा मृत्यू झाला. दुर्दैवाने झालेल्या अपघाताने प्रभादेवी दगावल्या असेच सगळ्यांना वाटत होते. ५ वर्षांनी २०२२ मध्ये कुटुंबावर पुन्हा हाच प्रसंग उद्भवला. यावेळी विशालची पत्नी एकता हिचा अचानक मृत्यू झाला. एकताचा हृदयविकाराच्या झटका आला, तिला रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु तिथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अचानक त्याच रात्री तिचा मृत्यू झाला. आजारपणामुळे एकता हे जग सोडून गेली त्यामुळे नातेवाईकांना धक्का बसला.
आता घरात केवळ बाप आणि मुलगा हेच बाकी होते. परंतु २०२४ मध्ये एक दुर्दैवी घटना घडली. विशालचे वडील जे व्यवसायाने फोटोग्राफर होते त्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. कामावरून घरी परतताना त्यांचा अपघात झाला आणि कुटुंबातील आणखी एकाचा दुर्दैवी अंत झाला. या तिघांचे मृत्यू नैसर्गिक आणि अपघाती मानले जात होते. परंतु खरा खेळ तेव्हा उघड झाला जेव्हा विशालने वडिलांच्या मृत्यूनंतर विमा क्लेम केला. ही रक्कम जवळपास ३९ कोटींची होती. एक पॉलिसी नाही तर वेगवेगळ्या ६० विमा पॉलिसी विशालने क्लेम केल्या.
इतकी मोठी रक्कम ऐकून विमा कंपनीचे अधिकारीही हैराण झाले. विशाल आणि त्याचे वडील प्रत्येक वर्षी ३० लाख रूपये प्रिमियम म्हणून भरायचे, परंतु सिंघल कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती. मुकेश सिंघल हे सामान्य फोटोग्राफर होते आणि विशालही काही मोठे काम करत नव्हता. मग एवढ्या मोठ्या रक्कमेच्या पॉलिसी कशा काढल्या गेल्या हा प्रश्न पुढे आला. विमा कंपन्यांनी तपास सुरू केला तेव्हा पोलिसांकडे खळबळजनक तक्रार दाखल झाली. तक्रारदाराने स्वत:ला विशालची चौथी पत्नी असल्याचा दावा केला. विशालने तिच्या नावावरही ३ कोटीचा विमा काढला होता. विशालने ज्यांच्या ज्यांच्या नावावर पॉलिसी घेतली ते सगळे रहस्यमयी मृत्यूचा शिकार बनले.
पोलिसांनी तपास सुरू केला असता एक एक रहस्य उलगडत गेले. २०१७ साली आईच्या मृत्यूनंतर विशालला २५ लाखांचा विमा मिळाला होता. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याला ८० लाख रूपये मिळाले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने ३९ कोटी क्लेम केले होते. या प्रकरणासाठी विशेष पथक नेमण्यात आले तेव्हा विशालचे वडील मुकेश यांचा मृत्यू रस्ते अपघातात नाही तर हॉस्पिटलमध्ये हत्येमुळे झाल्याचं कळलं. विशालने वडिलांना नवजीवन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, त्यानंतर त्यांना मेरठच्या आनंद हॉस्पिटलमध्ये आणले गेले. हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याच्या मदतीने मुकेश सिंघल यांची हत्या करण्यात आली. या हत्येला रस्ते अपघाताचं कारण देत प्रकरण दडपण्यात आले.
इतकेच नाही तर हीच विशाल मोडस ऑपरेंडी होती. त्याने त्याच्या आईचाही खून केला होता. खोट्या रस्ते अपघातात त्यांना जखमी केले त्यानंतर हॉस्पिटलमध्ये गळा दाबून खून करण्यात आला होता. दोन्ही प्रकरणात अज्ञात वाहनाच्या धडकेत हे मृत्यू झाल्याचे बोलले गेले. या कटात विशाल एकटा नव्हता तर त्याचे आणखी काही साथीदार होते. हे सर्व विमा पॉलिसी उकलण्यासाठी त्याला मदत करत होते. आता पोलिसांनी विशाल आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. आता पोलीस हॉस्पिटल प्रशासन, पोस्टमोर्टम हाऊस आणि डॉक्टरांवर आहे.
Web Summary : A Meerut man orchestrated the deaths of his mother, wife, and father, collecting ₹39 crore from 60 insurance policies. He faked accidents and murdered them in hospitals with accomplices. Police have arrested the man and an associate.
Web Summary : मेरठ में एक व्यक्ति ने 60 बीमा पॉलिसियों से ₹39 करोड़ इकट्ठा करने के लिए अपनी मां, पत्नी और पिता की हत्या की साजिश रची। उसने दुर्घटनाओं का नाटक किया और साथियों के साथ अस्पतालों में उनकी हत्या कर दी। पुलिस ने आदमी और एक सहयोगी को गिरफ्तार किया है।