शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:16 IST

Raj Kushwaha And Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड सोनम रघुवंशीचा बॉयफ्रेंड राज कुशवाह याची आई आणि बहिण यांनी पोलिसांचे दावे फेटाळून लावले आहेत

मेघालयमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड सोनम रघुवंशीचा बॉयफ्रेंड राज कुशवाह याची आई आणि बहिण यांनी पोलिसांचे दावे फेटाळून लावले आहेत आणि त्यांचा मुलगा आणि भाऊ निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. मेघालय पोलिसांनी सोनम आणि राज कुशवाहसह पाच जणांना अटक केली आहे, परंतु राजच्या कुटुंबाने हा कट असल्याचं म्हटलं.

राज कुशवाहच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, "माझा मुलगा आजारी होता, त्याला मुद्दाम फसवलं जात आहे. तो सोनमच्या भावाकडे काम करायचा, त्यामुळे त्याचं बोलणं व्हायचं, मात्र कोणतेही प्रेमसंबंध नव्हते. माझा मुलगा फक्त २० वर्षांचा आहे, तो दिवसभर कपड्यांच्या दुकानात काम करायचा आणि रात्री वर्तमानपत्र विक्रेत्याकडे जायचा. तो इतरांना मदत करायचा, तो हत्या करू शकत नाही. पोलीस खोटं बोलताहेत."

"राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा

नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल

राजच्या बहिणीनेही सांगितलं की, "माझा भाऊ असा अजिबात नाही. परवा तो विशालच्या घरी जात असल्याचं सांगून निघून गेला. मी संध्याकाळी त्याच्याशी बोलले, पण त्यानंतर त्याने फोन केला नाही. काल (सोमवार) सकाळी, त्याच्यासोबत काम करणाऱ्या दुर्गेश भैय्याने मला फोन केला आणि राजशी बोलायचं असल्याचं सांगितलं. त्यानंतर गोविंद भैय्याने मला सांगितलं की, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मी कधीही सोनमला भेटले नाही आणि ती कधीही आमच्या घरी आली नाही. कोरोनामुळे पप्पांचा मृत्यू झाला तेव्हा राज दहावीत होता, तेव्हापासून त्याने शिक्षण सोडलं आणि कामाला सुरुवात केली."

५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी

सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?

मेघालय पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोनमने तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहसोबत राजाला मारण्याचा कट रचला होता. सोनमच्या वडिलांच्या प्लायवूड कारखान्यात काम करणाऱ्या राजने आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद कुर्मी या तीन जणांना सुपारी दिली होती. २३ मे रोजी राजाची हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह धबधब्याजवळील दरीत फेकण्यात आला. २ जून रोजी मृतदेह सापडला आणि त्यानंतर सोनमला अटक करण्यात आली.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmarriageलग्नArrestअटक