शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या पतीने सर्जिकल चाकूने हल्ला केला, मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरचे हादरवून टाकणारे शब्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 13:11 IST

Murder Case : मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात महिलेने पतीवर आरोप केले, तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बुलंदशहर - मला नीरजने मारले.. माझ्या पतीने.. दोन चाकूने मारले. आणि काही वेळाने तिला जीव गमवावा लागला. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने डॉक्टर पत्नीचा गळा चिरून खून केला आहे. मृत्यूपूर्वीपोलिसांना दिलेल्या जबाबात महिलेने पतीवर आरोप केले, तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.३० वर्षीय पूनम देवी असे मृत महिलेचे नाव आहे. तिचे लग्न नीरज सिंगसोबत ५ वर्षांपूर्वी झाले होते. दोघांना एक ३ वर्षाचा मुलगाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती आणि सासरच्या लोकांकडून हुंड्याच्या मागणीमुळे ती वेगळी राहू लागली. महिलेने बुलंदशहरमध्ये क्लिनिक उघडले होते. आरोपी पतीने तिच्या मानेवर सर्जिकल चाकूने दोन वार केले.

घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी डॉक्टर महिला क्लिनिकच्या केबिनमधून बाहेर आली तेव्हा अचानक तिच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. ती त्या खोलीकडे धावली जिथे तिचे सहकारी बसले होते. पूनम जखमी अवस्थेत क्लिनिकमधून बाहेर आली आणि तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिच्या पतीला पकडण्यासाठी स्थानिक लोकांना सांगितले.घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णवाहिकेसमोर पोहोचले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी पूनमचा मृत्यूपूर्व जबाब एका हवालदाराने नोंदवला. पूनमच्या आक्रोशाने जमलेल्या लोकांनी आरोपी पती नीरजला पळून जाण्यापूर्वी पकडले. तेथे उपस्थित लोकांनी कापूस ठेवून मानेतून निघणारे रक्त थांबविण्याचा प्रयत्न केला. यासोबतच गळ्यात कापडही बांधले होते. अखेरच्या क्षणी प्रयत्न करूनही पूनमचा जीव वाचू शकला नाही. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गुलावठी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूdoctorडॉक्टर