लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:09 IST2026-04-06T12:08:42+5:302026-04-06T12:09:08+5:30

Crime News : अनैतिक संबंधांमधून पत्नीने प्रियकर आणि मेहुण्यासोबत मिळून पतीची हत्या घडवून आणली.

muzaffarpur-wife-conspires-with-lover-brother-in-law-to-kill-husband-makeshwar-pandit-murder | लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!

AI Generated Image

बिहारमधील प्रसिद्ध भांडी व्यावसायिक मकेश्वर पंडित यांच्या हत्येचा पोलिसांनी खुलासा केला असून, यात चक्क त्यांच्या पत्नीचाच हात असल्याचे समोर आले आहे. अनैतिक संबंधांत अडसर ठरणाऱ्या पतीला कायमचे संपवण्यासाठी पत्नीने आपल्या प्रियकर आणि मेहुण्यासोबत मिळून प्रोफेशनल शूटरला सुपारी दिली होती.

नेमकं प्रकरण काय?

मोतीपूर पोलीस स्टेशन हद्दीत २ एप्रिल रोजी मकेश्वर पंडित यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मकेश्वर बाजारातून घरी परतत असताना वाटेतच काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी जेव्हा प्रकरणाचा तपास सुरू केला, तेव्हा धागेदोरे थेट घरातील व्यक्तींपर्यंत पोहोचले.

अनौतिक संबंधातून रचला कट

पोलिस तपासात समोर आले की, मकेश्वर यांच्या पत्नीचे शेजारी राहणाऱ्या मुन्ना पंडितसोबत प्रेमसंबंध होते. इतकेच नाही तर मकेश्वर यांचा आणखी एक नातेवाईक महेश पंडित याचेही मकेश्वरच्या पत्नीशी अवैध संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी मकेश्वर यांनी पत्नीला फोनवर बोलताना रंगेहात पकडले होते. यावरून त्यांनी मुन्नाच्या घरी जाऊन जाब विचारला होता. हाच राग मनात धरून मुन्ना आणि महेशने मकेश्वरला संपवण्याचा कट रचला.

शूटरला दिली सुपारी

मकेश्वर यांचा काटा काढण्यासाठी दोन्ही आरोपींनी एका सराईत गुंडाला पैशांचे आमिष दाखवून सुपारी दिली. २ एप्रिल रोजी संधी मिळताच शूटरने मकेश्वर यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी छापेमारी करून मुन्ना आणि महेश पंडितला अटक केली आहे, मात्र शूटर अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

१२ वर्षांचा संसार उद्ध्वस्त

मकेश्वर पंडित यांचे लग्न १२ वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन मुले आहेत. वडिलांची हत्या आणि आईचा या कटात असलेला सहभाग यामुळे या मुलांचे छत्र हरवले असून संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title : पत्नी ने प्रेमी संग मिलकर पति को मारा, 12 साल बाद रचा षड्यंत्र!

Web Summary : बिहार में पत्नी ने प्रेमी और देवर के साथ मिलकर पति की हत्या की सुपारी दी। अवैध संबंध में बाधा बनने पर पति को रास्ते से हटाया। हत्या से तीन बच्चे अनाथ हो गए।

Web Title : Wife, lover conspired to kill husband after 12 years of marriage.

Web Summary : Bihar businessman killed; wife, her lover, and brother-in-law hired a shooter due to an affair. The wife's extramarital affair and the husband's objection led to the murder plot, leaving three children orphaned.