विवाहित तरुणी पुस्तक देण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली,नंतर बॉफ्रेंडसोबत बनवला प्लॅन अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 15:28 IST2022-12-06T15:26:46+5:302022-12-06T15:28:02+5:30
बिहारमध्ये एक विवाहित तरुणी पुस्तक मैत्रिणीला देण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली, त्यानंतर पुन्हा ती परत न आल्याचे समोर आले आहे.

विवाहित तरुणी पुस्तक देण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली,नंतर बॉफ्रेंडसोबत बनवला प्लॅन अन्...
बिहारमध्ये एक विवाहित तरुणी पुस्तक मैत्रिणीला देण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली, त्यानंतर पुन्हा ती परत न आल्याचे समोर आले आहे. घरच्यांनी सोध मोहिम सुरू केली. यानंतर घरच्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या घटनेचा उलघडा केला. ही घटना बिहारमधील मजफ्फरपूर मधील आहे.
सहा महिन्यापूर्वी लग्न झालेली तरुणी माहेरी आली होती. यावेळी ती मैत्रिणीला पुस्तक देण्याच्या बाहण्याने घराच्या बाहेर पडली, यावेळी ती आपल्या बॉफ्रेंडसोबत पळून जाते. या दोघांची ओळख कॉलेजमध्ये झाली.
या संपूर्ण प्रकरणात तरुणीच्या नातेवाईकांनी एका तरुणावर अपहरणाचा आरोप करत पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता मुलीचे कुटुंब वेगळेच सांगत आहेत. मुलीच्या आईचे म्हणणे आहे की तिच्या मुलीचे कोणीतरी अपहरण केले आहे.
एका तरुणाने त्यांच्या मुलीचे महाविद्यालयातून अपहरण केल्याचा दावा मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. यापूर्वीही त्याने मुलीचे अपहरण केले होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये बोलणी झाल्यानंतर समेट झाला. त्यानंतर मुलीचा विवाह झाला. शनिवारी मुलगी आपल्या माहेरी आली होती, असं कुटुंबीयांनी सांगितले. यावेळी तिने मैत्रिणीला काही पुस्तके देण्याचे सांगून ती घरातून निघून गेली आणि परत आलीच नाही. बराच वेळ मुलगी घरी न पोहोचल्याने तिचा शोध सुरू झाला, मात्र ती कुठेच सापडली नाही.तिचा मोबाईलही बंद होता. यानंतर त्या तरुणाने मुलीचे अपहरण केल्याचे समोर आले.
"पप्पा, नवऱ्याला बाईक दिली नाही तर तो मला..."; लग्नानंतर 6 महिन्यातच लेकीसोबत घडलं भयंकर
तो तरुण मुलीच्या घरीही जात होता असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. फोनवरुन मुलीली त्रास द्यायचा. तरुणाला अटक करण्याची मागणी कुटुंबियांनी केला आहे.