शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बदल्याची आग! बॉयफ्रेंडने दिला धोका, मुलाच्या अपहरणाचा कट; ५ मुलांच्या आईने घेतला सूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 18:49 IST

एका मुलाच्या अपहरण प्रकरणाची उकल करताना पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील मनियारी पोलीस स्टेशन हद्दीतील जमरुआ गावात एका मुलाच्या अपहरण प्रकरणाची उकल करताना पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता मुलाच्या आईलाच अटक केली आहे. पाच मुलांच्या या आईने तिच्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी अपहरणाचा खोटा कट रचला होता. पण पोलिसांनी तिचा कट उधळून लावला आणि मुलाला शोधून काढलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, १८ जानेवारी रोजी रेणू देवी नावाच्या महिलेने मुझफ्फरपूरच्या मनियारी पोलीस ठाण्यात तिच्या मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती.  तक्रारीत तिने वैशाली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कौशल कुमार आणि अभिषेक कुमार या दोन ओळखीच्या लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला. पोलिसांनी १९ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला. सर्वप्रथम आरोपींचं लोकेशन शोधलं.

आवश्यक माहिती आणि पुरावे गोळा केल्यानंतर, पोलिसांनी आरोपी नंबर एक कौशल कुमारला बोलावलं. त्याच्याशी झालेल्या संभाषणानंतर भलतीच माहिती समोर आली. आरोपीने सांगितलं की त्याचे त्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. तो तिला नियमितपणे पैसे पाठवत असे. पण काही महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न झाल्यामुळे तिने त्याच्यासोबतचे नातं संपवलं. त्याला त्या महिलेवर मुलाचं अपहरण केल्याचा संशय होता. या प्रकरणाबाबत पोलीसही आता अधिक सतर्क झाले.

पोलिसांसमोर धक्कादायक सत्य

रेणू देवीच्या मागे पोलिसांचं पथक तैनात करण्यात आलं. ती तिच्या आईवडिलांच्या घरी पोहोचली तेव्हा पोलिसांनी तिथे छापा टाकला. पोलिसांसमोर एक धक्कादायक सत्य समोर आलं. महिलेने ज्या मुलाचं अपहरण झाल्याचा आरोप केला होता तो तिच्या बहिणीसोबत तिच्या माहेरी होता. पोलीस पथकाने महिलेला पोलीस ठाण्यात आणलं. तिची कसून चौकशी केली असता तिने संपूर्ण सत्य सांगितलं. तिने प्रेमसंबंधाची कबुली दिली आणि कट रचल्याचं उघड झालं.

प्रियकरासोबत करायचं होतं लग्न

रेणू देवी यांनी पोलिसांना सांगितलं की, तिला तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचं होतं. पण त्याने तिला फसवलं आणि दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. तिला याच हे खूप वाईट वाटलं. त्याला धडा शिकवण्यासाठी तिने हा कट रचला. यानंतर तिने आपल्या मुलाला बहिणीकडे पाठवलं आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तिचा प्रियकर बंगळुरूमध्ये काम करतो. तिला वाटत होतं की, पोलिसांनी त्याला अटक करावी आणि बिहारला आणावं जेणेकरून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिसKidnappingअपहरण