गर्लफ्रेंडला भेटायला गेला अन् गावकऱ्यांनी वीजेच्या खांबाला बांधून दिला चोप, नेमकं काय घडलं वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 20:22 IST2022-01-31T20:22:13+5:302022-01-31T20:22:36+5:30

गावातील नागरिकांनी एका तरुणाला वीजेच्या खांबाला बांधून जबर मारहाण केल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

muzaffarpur boyfriend came to meet girlfriend beaten up by the villagers premi premika video viral social media | गर्लफ्रेंडला भेटायला गेला अन् गावकऱ्यांनी वीजेच्या खांबाला बांधून दिला चोप, नेमकं काय घडलं वाचा...

गर्लफ्रेंडला भेटायला गेला अन् गावकऱ्यांनी वीजेच्या खांबाला बांधून दिला चोप, नेमकं काय घडलं वाचा...

मुझफ्फरपूर-

बिहारच्या मुझफ्फरपुरमध्ये एक अशी घटना समोर आलीय की जिथं एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला गेला असता गावकऱ्यांनी त्याला वीजेच्या खांबाला बांधून त्याला जबर मारहाण केली आहे. संबंधित घटना मनियारी ठाणे हद्दीत काल रात्री घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. 

पोलिसांजवळ जेव्हा व्हायरल व्हिडिओ पोहोचला त्यानंतर चौकशीला सुरुवात झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मनियारी ठाणे हद्दीतील मरीचा गावात घडली आहे. गावातील नागरिकांनी एका तरुणाला वीजेच्या खांबाला बांधून जबर मारहाण केल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार संबंधित तरुण त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गावात आला होता. ग्रामस्थांना याची माहिती मिळताच त्यांनी या तरुणाला गाठलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणानं खूप विनवणी केली आणि त्याची बाजू मांडण्याचाही प्रयत्न केला. पण गावकरी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तर इतरांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. 

दोषींविरोधात होणार कडक कारवाई
व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येनं लोक जमा असल्याचं दिसून येत आहे. यात अनेक गावकरी एका तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनियारी ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सब इन्स्पेक्टर सुजीत कुमार मिश्रा यांनी सांगितलं की अद्याप या प्रकरणात कुणीही तक्रार नोंदवलेली नाही. पण आम्ही व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. यात जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असंही पोलीस अधिकारी म्हणाले. 

Web Title: muzaffarpur boyfriend came to meet girlfriend beaten up by the villagers premi premika video viral social media