Muskan Video Viral: मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांड दररोज नवीन खुलासे होत आहे. सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल सध्या तुरुंगात आहेत. पण, त्याचे एक-एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता मुस्कान आणि साहिलचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात दोघेही रंग खेळताना दिसत आहे. नशेत धुंद मुस्कान साहिलच्या गळ्यात पडताना आणि डान्स करताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सौरभच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच मुस्कान आणि साहिलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. हा व्हिडीओ सौरभची हत्या केल्यानंतरचा आहे.
साहिलच्या गळ्यात पडून मुस्कानचा रोमान्स
मिळालेल्या माहितीनुसार, ३-४ मार्चच्या रात्री दोघांनी सौरभ राजपूतची हत्या केली. त्यानंतर दोघे हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला गेले. १४ मार्च रोजी दोघांनी धुळवड साजरी केली. ४५ सेकंदापेक्षा जास्त वेळेच्या या व्हिडीओमध्ये दोघेही नशेत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा >> विवाहबाह्य संबंधांचा आणखी एक निष्पाप बळी; पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले
या व्हिडीओत मुस्कान डान्स करताना दिसत आहे. ती साहिलच्या गळ्यात पडते. दोघेही नाचतात. इतकंच नाही, तर ती इतकी नशेत होती की, नाचता नाचता ती खाली पडली. तिला साहिल आणि आणखी एक व्यक्ती उठवतो. साहिलही लडखडताना दिसत आहे. प्रियकर साहिलसोबत धुळवड साजरी करताना खूप खूश दिसत आहे.
मुस्कान आणि साहिलचा व्हिडीओ बघा
सौरभ राजपूत हत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर मुस्कानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वीही मुस्कानचे काही व्हिडीओ आलेले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये मुस्कान साहिलसोबत एका पबमध्ये डान्स करताना दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये मुस्कान साहिलला केक खाऊ घालतानाही दिसत आहे.
लंडनहून परतलेल्या सौरभ कुमार राजपूतची मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी ३ मार्चच्या रात्री हत्या केली होती. सौरभच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते ड्रममध्ये भरले. त्यानंतर सिमेंटने ड्रम्प पॅक केला होता. पाच वर्षांच्या मुलीला माहेरी सोडून मुस्कान हिमाचल प्रदेशला फिरायला निघून गेली होती.