शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

डोक्यात रॉड मारून दिघीत तरूणाचा खून ; अवघ्या काही तासात आरोपीला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 2:36 PM

नातेवाईक महिलेला त्रास दिल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरूणाची पानटपरीचालकाशी वादावादी झाली.

पिंपरी : नातेवाईक महिलेला त्रास दिल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरूणाची पानटपरीचालकाशी वादावादी झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. पानटपरी चालकाने जवळच पडलेला लोखंडी रॉड उचलून तरूणाच्या डोक्यात मारला. गंभीर जखमी झाल्याने तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दिघी मॅग्झिन चौकात घडली. युवक विक्रम वाघमारे (वय २२,रा.स्पाईन रस्ता, मोशी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. दिघी पोलिसांनी संतोष मनीराम चौधरी या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या नातेवाईक महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून वाघमारे आणि चौधरी कुटूंबात चार पाच महिन्यांपासून वाद होता. याच कारणावरून आरोपी चौधरी आणि मृत्यू झालेल्या युवक वाघमारे याचे मंगळवारी दुपारी भांडण झाले. पानटपरी चालवित असलेल्या संतोष चौधरी या आरोपीने पानटपरीजवळ पडलेली लोखंडी सळई उचलुन युवकाच्या डोक्यात मारली. दुपारी तीनच्या सुमारास दिघी मॅग्झिन चौकात हा प्रकार घडला. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोघेही हमरीतुमरीवर आले. शिवीगाळ करीत एकमेकांच्या अंगावर धावून आले. या भांडणात आरोपी चौधरी याने जवळच पडलेला लोखंडी रॉड उचलून विक्रमच्या डोक्यात मारला. डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने रक्तबंबाळ होऊन विक्रम खाली कोसळला. त्यावेळी आरोपी तेथून पसार झाला होता. गजानन महाराज नगर येथून दिघी पोलिसांनी आरोपी संतोष चौधरी याला अटक केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखून