बावधन मध्ये डोक्यात दगड घालुन अज्ञाताचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 17:00 IST2018-12-26T16:56:35+5:302018-12-26T17:00:27+5:30
बावधन येथील सेवारस्त्यावर डोक्यात गंभीर जखम झाल्याने मृतावस्थेत पडलेला इसम बुधवारी आढळुन आला.

बावधन मध्ये डोक्यात दगड घालुन अज्ञाताचा खून
पिंपरी : बावधन येथील सेवारस्त्यावर डोक्यात गंभीर जखम झाल्याने मृतावस्थेत पडलेला इसम बुधवारी आढळुन आला. कोणीतरी डोक्यात दगड घातल्याने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज हिंजवडी पोलिसांनी व्यकत केला आहे.
हिंजवडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयाच्या व्यक्तिचा मृतदेह आहे. त्यांच्याकडे ओळख पटेल असा कोणताही पुरावा पोलिसांना आढळुन आलेला नाही. डोक्यात दगड घालुन अज्ञात आरोपीने खून केला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.पोलिसांकडून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.