शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

पुसद येथे युवकाची हत्या; तिघांना ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 4:07 PM

गुरुवारी रात्री बसस्थानकानजीक घडली घटना  

ठळक मुद्देतिघांनीही शेख आसिफला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पुसद (यवतमाळ) : येथील बसस्थानक परिसरात गुरुवारी रात्री तिघांनी शेख आसिफ शेख हानिफ (२७) रा.पार्वतीनगर याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चाकूने भोसकले. यात शेख आसिफ ठार झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.शेख आसिफ शेख हानिफ याच्यावर गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास शेख अलताफ शेख सलाम (२५), शेख सादिक शेख सलाम (१९) आणि शेख इम्रान शेख नवाब (२०) सर्व रा.कानडे ले-आऊट यांनी जुन्या भांडणातून हल्ला केला. तिघांनीही शेख आसिफला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. शेख अलताफ याने चाकूने पोटावर वार केले. या मारहाणीत शेख आसिफचा मृत्यू झाला. या प्रकरणी शेख सलीम शेख मुसा (२७) रा.दुधे ले-आऊट याने वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी या प्रकरणाची सूत्रे स्वत:कडे घेऊन आरोपींचा शोध सुरू केला. तिन्ही आरोपींना रात्रीच अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक विजय रत्नपारखी, पोलीस उपनिरीक्षक विश्वास पावरा, दीपक ताटे, कैलास ससाने, दिगांबर घुमनर, नंदकुमार चौधरी, जलाल शेख, माधव आत्राम, दयानंद जांभळे, अभिषेक इंगळे, कुणाल रुडे, प्रशांत स्थूल, अनुप हातोलकर, मनोज कदम, कैलास मुकाडे आदींनी आरोपींना तातडीने अटक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकYavatmalयवतमाळ