काळेवाडीत किरकोळ कारणावरून तरुणाचा खून; सात जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:01 PM2020-08-20T17:01:13+5:302020-08-20T17:01:52+5:30

कोयत्याने वार करून काळेवाडी येथील तापकीर चौकात करण्यात आली होती हत्या.

Murder of a youth for normal reasons in Kalewadi; Crime registred against seven people | काळेवाडीत किरकोळ कारणावरून तरुणाचा खून; सात जणांवर गुन्हा

काळेवाडीत किरकोळ कारणावरून तरुणाचा खून; सात जणांवर गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देपाच संशयित आरोपींना चार दिवसांची कोठडी

पिंपरी : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात कोयत्याने वार करून एका तरुणाचा खून केला. काळेवाडी येथील तापकीर चौक येथे धोंडिराज मंगल कार्यालयात बुधवारी (दि. १९) रात्री साडेआठ ते सव्वानऊच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यातील पाच जणांना पोलिसांनीअटक केली. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. . 
शुभम जनार्दन नखाते (वय २२, रा. नखातेनगर, काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील (वय २३, रा. तापकीर चौक, काळेवाडी), प्रवीण ज्योतिराम धुमाळ (वय २१), अविनाश धनराज भंडारी (वय २३), मोरेश्वर रमेश आष्टे (वय २१), अजय भारत वाकोडे (वय २३, सर्व रा. तापकीर नगर, काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर राज तापकीर व प्रेम वाघमारे यांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयत शुभम याचे वडील जनार्दन आत्माराम नखाते (वय ५२, रा. नखातेनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. २०) फिर्याद दिली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम व आरोपी ज्ञानेश्वर पाटील यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. ते भांडण मिटविण्याच्या बहाण्याने आरोपी यांनी कट रचून शुभम याला बोलावून घेतले. त्यानुसार शुभम बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास धोंडिराज मंगल कार्यालयात गेला. त्यावेळी आरोपी यांनी शुभम याच्यावर कोयत्यासारख्या हत्याराने वार करून शुभम याला जिवे ठार मारले.
शुभम याच्या विरोधात विनयभंग, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच संशयितांपैकी काही आरोपींवर देखील गुन्हे दाखल आहेत. शुभम याच्या वडिलांनी फिर्याद दिल्यानुसार वाकड पोलिसांनी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच पाच आरोपींना  अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता रविवारपर्यंत (दि. २३) पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने तपास करीत आहेत.

Web Title: Murder of a youth for normal reasons in Kalewadi; Crime registred against seven people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.