शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला फोन केल्याच्या रागातून तरुणाचा खुन, आरोपीला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 15:20 IST

पत्नीला फोन करण्याच्या किरकोळ कारणावरुन तरुणावर धारधार शस्त्राने वार करुन त्याचा खुन करण्याचा प्रकार सोमवारी रात्री कॅम्पमध्ये घडला.

पुणे : पत्नीला फोन करण्याच्या किरकोळ कारणावरुन तरुणावर धारधार शस्त्राने वार करुन त्याचा खुन करण्याचा प्रकार सोमवारी रात्री कॅम्पमध्ये घडला. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना कॅम्प एज्युकेशनच्या मागील बाजूला असलेल्या कॅनॉलच्या कडेला सोमवारी सायंकाळी घडली.किसन सुरेश नुय्या (वय २७, रा़ सर्व्हेट क्वार्टर, स्वारगेट) असे अटक केलेल्याचे नाव असून महंमद असे खुन झालेल्याचे नाव आहे. पत्नीला फोन करण्याच्या रागातून हा खुन करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन नुय्या हा सफाईचे काम करतो. काल रात्री नाल्याजवळ एकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती लष्कर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर एका ३० ते ३५ वर्षाच्या तरुणाच्या अंगावर धारधार शस्त्राने वार करुन खुन केल्याचे दिसून येत होते. मात्र, या तरुणाची ओळख पटली नव्हती. या भागात पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यावेळी तेथे किसन हा त्या ठिकाणी घुटमळत असल्याचे लोकांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपणच त्याला मारल्याची कबुली दिली. महंमद  हा त्याच्या पत्नीला फोन करत असल्याने रागातून आपण त्याचा खुन केल्याचे किसन सांगत आहे. महंमद याची अजून माहिती उपलब्ध झाली नसून लष्कर पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस