शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

अवैध धंद्यातून घडला थरार, तरुणीची हत्या; तांडापेठ परिसरात प्रचंड दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 12:41 AM

मुळची छत्तीसगड, राजनांदगाव येथील रहिवासी असलेली पिंकी नाईक तलाव परिसरात एका मैत्रीणीसह राहत होती. तांडापेठ भागात जुगार अड्डा, दारू अड्डा चालविणाऱ्या काही जणांसोबत तिचा वाद सुरू होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - पाचपावलीच्या तांडापेठ - नाईक तलाव परिसरात एका तरुणीची अवैध धंद्यात गुंतलेल्या आरोपींनी भीषण हत्या केली. पिंकी लखनलाल वर्मा (वय २७) असे मृत तरुणीचे नाव आहे. भरदुपारी झालेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

मुळची छत्तीसगड, राजनांदगाव येथील रहिवासी असलेली पिंकी नाईक तलाव परिसरात एका मैत्रीणीसह राहत होती. तिचा भाऊ वाठोड्यात राहतो. तांडापेठ भागात जुगार अड्डा, दारू अड्डा चालविणाऱ्या काही जणांसोबत तिचा वाद सुरू होता. तिने पाचपावली पोलिसांकडे तक्रारही केली होती. त्यावरून हा वाद तीव्र झाला होता. या पार्श्वभूमीवर, पिंकी सोमवारी दुपारी २ च्या सुमारास तिच्या तांडापेठमधील घराबाहेर उभी असताना तीन आरोपी तेथे आले. त्यांनी पिंकीला घेरून शिवीगाळ करत तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. दबंग स्वभावाच्या पिंकीने आरोपींचा प्रतिकार केला. नंतर जीव वाचविण्यासाठी बाजुच्या ईश्वर निखारे नामक व्यक्तीच्या घराकडे धावली. मात्र, मोठ्या प्रमाणात घाव बसल्याने आणि अत्याधिक रक्तस्त्राव झाल्याने ती निखारेंच्या दारासमोर पडली. ती मृत झाल्याचे लक्षात आल्याने आरोपी पळून गेले. दरम्यान, आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावली. त्यांनी पोलिसांना माहिती देऊन पिंकीला बाजूच्या डॉक्टरकडे नेले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. माहिती कळताच पाचपावली पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी शेजाऱ्यांना आरोपींची नावे विचारली. उपलब्ध झालेल्या माहितीवरून पोलिसांची विविध पथके आरोपींना शोधण्यासाठी धावपळ करीत होते.

----आरती बोरकर हत्याकांडाची पुनरावृत्तीकाही वर्षांपूर्वी याच भागात शिव सेनेच्या पदाधिकारी आरती बोरकर यांचीही अशीच भीषण हत्या करण्यात आली होती. पिंकीसुद्धा एका राजकीय पक्षाशी जुळली होती. ती या भागातील नागरिकांच्या मदतीला धावून जायची. पोलिसांशी तिचे सलोख्याचे संबंध होते. ती अवैध धंदेवाल्यांची मुखबिरी करून वरिष्ठांना माहिती देत असल्याचा आरोप होता.

---१५ दिवसांचा ईशारा भोवला

या भागात दुर्गेश मोना आणि युवराज नामक आरोपी अवैध दारू, सट्टा आणि जुगार अड्डा चालवितात. या भागातील युवकांचे भविष्य खराब होत असल्याचे सांगून पिंकीने त्यांना १५ दिवसांत सर्व धंदे बंद करा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जा, असे म्हटले होते. त्यामुळेच आरोपींनी तिला संपविल्याची चर्चा या भागात आहे. पिंकीच्या नजिकच्या व्यक्तीनेही उपरोक्त आरोपींवर संशय व्यक्त केला आहे.

टॅग्स :Policeपोलिस