नागपुरातील वाठोड्यात तरुणाची निर्घृण हत्या : लहान भावानेच केला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 08:02 PM2020-03-09T20:02:02+5:302020-03-09T20:03:42+5:30

अवघ्या कुटुंबाला वेठीस धरणाऱ्या भावाची त्याच्या लहान भावाने तीन साथीदारांच्या मदतीने निर्घृण हत्या केली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे ही थरारक घटना घडली.

The murder of a young man in Wathora in Nagpur: a murder committed by a younger brother | नागपुरातील वाठोड्यात तरुणाची निर्घृण हत्या : लहान भावानेच केला घात

नागपुरातील वाठोड्यात तरुणाची निर्घृण हत्या : लहान भावानेच केला घात

Next
ठळक मुद्देमुख्य आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवघ्या कुटुंबाला वेठीस धरणाऱ्या भावाची त्याच्या लहान भावाने तीन साथीदारांच्या मदतीने निर्घृण हत्या केली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे ही थरारक घटना घडली. शेजारी धावल्यामुळे ही घटना लगेच उघडकीस आली. वाठोडा पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली असून त्याचे तीन साथीदार फरार आहेत.
विक्की गुरुदेवप्रसाद जयस्वाल (वय २६) असे मृताचे नाव आहे. तर, त्याचा लहान भाऊ शुभम गुरुदेवप्रसाद जयस्वाल (वय २४) या हत्याकांडाचा सूत्रधार आहे.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, मृत विक्की हा त्याच्या घराच्या बाजूला राहणारे गणेश राणे यांच्याकडे कॅटरर्सच्या कामावर जायचा. त्याला दारूचे व्यसन होते. तो दारू पिला की सर्व विसरून जायचा. विक्षिप्तपणे वागायचा. आई, भाऊ, पत्नी या सर्वांनाच तो प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. घाणेरड्या शिव्या देऊन मारहाण करायचा. साहित्याची फेकफाक करायचा. घरच्यांचे खाणेपिणेही त्याने मुश्कील केले होते. जवळपास रोजचाच त्याचा हा त्रास होता. रविवारी रात्री असेच झाले. त्याने दारूच्या नशेत घरातील सदस्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. घरात आदळआपट केली. मध्यरात्र झाली तरी त्याचा त्रास कमी होत नव्हता. त्याला वारंवार समजावूनही तो ऐकत नव्हता. त्याच्या या वर्तणुकीने आई, पत्नी आणि विक्कीचा भाऊही रडकुंडीला आला होता. त्यामुळे शुभमने त्याचे तीन साथीदार बोलावून घेतले. पहाटे २ च्या सुमारास दारूच्या नशेत तर्र असलेल्या विक्कीला अंथरुणावरच पकडून घातक शस्त्राचे अनेक घाव त्याच्या शरीरावर घातले. जीवाच्या आकांताने विक्की ओरडत होता. मात्र, त्याला जिवंत सोडले तर तो घरातील सर्वांनाच मारेल म्हणून शुभम आणि त्याचे साथीदार त्याच्यावर शस्त्राचे सपासप घाव घालत होते. पोट, कंबर, छाती, डोके, गळा अन् हातावरही अनेक घाव घालून आरोपींनी त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले.
दरम्यान, जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्याविक्कीचा आवाज ऐकून बाजूला राहणारे गणेश राणे आणि विक्कीचा मित्र रोहन आखरे (रा. कोतवाली) यांंनी तिकडे धाव घेतली. आरोपींनी आतून दार लावून घेतल्यामुळे त्यांनी १०० क्रमांकावर फोन करून या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षात कळविली.
काही वेळेतच वाठोडा पोलीस तेथे पोहचले. त्यांनी तेथेच बसून असलेल्या शुभमला ताब्यात घेतले.

Web Title: The murder of a young man in Wathora in Nagpur: a murder committed by a younger brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.