शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या; 12 तासात महिलेसह दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 18:23 IST

Immoral Relationship : हणमंत येरवे (40) या तरुणांची अष्टामोड शिवारात हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी समोर आली.

लातूर / चाकूर : जिल्ह्यातील चाकूर येथील एका तरुणांची अष्टामोड शिवारात हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी समोर आली. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत चाकूर पाेलीस ठाण्यात तिघाविराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, चाकूर येथील हणमंत व्यंकटी येरवे (४२) यांचे लातूररोड येथील शबाना मासुलदार हिच्याशी शारिरिक संबंध होते. परिणामी, शबाना, मुलगी आणि पती हे गत दहा वर्षापासून विभक्त राहत हाेते. कालंतराने हणमंत हा शबानाला दारू पिऊन त्रास देत हाेता. शबाना सततच्या त्रासाला कंटाळली होती. शबानाशी संतोष धोंडीराम घाडगे याच्याशी सूत जुळले. संतोष आणि शबाना यांच्यातील अनैतिक संबंध वाढत गेले. हणमंत याच्या वाढत्या त्रासाला कंटाळून शबाना आणि संतोष यांनी हणमंत येरवे याचा काटा काढण्याचा कट रचला. त्यानुसार शबानाने हणमंतला रविवारी सायंकाळी दुचाकीवरुन चाकूर येथे घेऊन गेली. लातूररोड नजीकच्या एका धाब्याजवळ दुचाकी सोडण्यात आली. तेथून आष्टा शिवारातील घरणी रेल्वे स्टेशन समोर ते गेले. त्यावेळी शबानाने मोबाईलवरुन एका व्यक्तीशी संपर्क केला. त्या व्यक्तीने हणमंत याच्याशी चर्चा केली. तेथून ते मोहदळ भागातील अडवळणावर हे गेले. तेथे दबा धरुन बसलेल्या संतोष धोंडीराम घाडगे (२५ रा. शिवणखेड ता. चाकूर) आणि लक्ष्मण बब्रुवान डांगे (३८ रा. आष्टा ता. चाकूर) यांनी हणमंत येरवे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. डोक्यात लोखंडी रॉडने जबर वार करुन हत्या करण्यात आली. सोमवारी दुपारी एका शेतकऱ्यांने मृतदेह पाहून पाेलिसांना कळविले. घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधिक्षक निकेतन कदम, पोलिस निरिक्षक बालाजी मोहिते यांनी भेट देवून पाहणी केली.

याबाबत पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत बारा तासात तिघांच्या मुसक्या आवळल्या. अधिक चाैकशी केली असता, त्यांनी खुनाची कबुली दिली. याबाबत शबाना मासुलदार, लक्ष्मण डांगे आणि संतोष घाडगे याला अटक करण्यात आली. याबाबत चाकूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूlaturलातूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी