शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

पुण्यातील धनकवडीत भाजी विक्रेत्याबरोबरील भांडणातून एकाचा खुन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 3:17 PM

रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्याबरोबर प्लास्टिक पिशवी देण्यावरुन झालेल्या वादातून खुन करण्याचा प्रकार धनकवडीत घडला़. 

ठळक मुद्देप्लास्टिक पिशवी ठरली काळ

पुणे : रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्याबरोबर प्लास्टिक पिशवी देण्यावरुन झालेल्या वादातून चाकूने वार करुन खुन करण्याचा प्रकार धनकवडीत घडला़. रामदास शामराव शिळीमकर (वय ३८, रा़ धनकवडी) असे खुन झालेल्याचे नाव आहे़. ही घटना धनकवडी येथील शेवटचा बसस्टॉपजवळील योगी सोसायटीसमोरील रोडवर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला़. याप्रकरणी विकास चव्हाण (वय. ४४, रा़. चव्हाणवाडा, धनकवडी, गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे़. सहकारनगर पोलिसांनी ज्ञानेश्वर वानखेडे व त्याचा भाऊ आणि मेव्हण्यावर गुन्हा दाखल केला आहे़.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ज्ञानेश्वर वानखेडे याचा धनकवडीत फुटपाथवर भाजी विक्रीचा व्यवसाय आहे़. रामदास शिळीमकर व ते गेल्या ७ ते ८ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात़. शिळीमकर हे बांधकामाची छोटी छोटी ठेका घेण्याचे काम करतात़. ते नेहमी वानखेडे यांच्याकडून भाजी घेत असतात़. शुक्रवारी त्यांनी भाजी घेतल्यानंतर प्लॉस्टिक पिशवी देण्यावरुन त्यांच्यात वाद झाला़. त्यानंतर शिळीमकर निघून गेले होते़. शिळीमकर, विकास चव्हाण व सुधीर मांगले हे रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास योगी पार्क येथील दुकानाबाहेरील रस्त्यावर गप्पा मारत होते़. त्यावेळी वानखेडे व त्याचे नातेवाईक तेथे आले़. त्यांनी शिळीमकर यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली़. ज्ञानेश्वर वानखेडे याने त्याच्याकडील चाकूने शिळीमकर यांच्या दंडावर, पोटावर व छातीवर वार करुन त्यांचा खुन केला़. अनेक वर्षे ओळख असताना इतक्या छोट्या कारणावरुन त्यांनी खुन केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी सांगितले की, गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे़. ज्ञानेश्वर वानखेडे याला पकडल्यानंतरच खुनामागील नेमके कारण समजू शकणार आहेत़. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस