मोहाडी येथे सराईत चोरट्याचा खून; चाकूने वार व डोक्यात दगड घातला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 23:12 IST2020-04-16T23:12:38+5:302020-04-16T23:12:55+5:30

चंद्रशेखर हा सराईत चोरटा होता. त्याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे आहेत

Murder of a thief in Mohadi Bhandara district | मोहाडी येथे सराईत चोरट्याचा खून; चाकूने वार व डोक्यात दगड घातला

मोहाडी येथे सराईत चोरट्याचा खून; चाकूने वार व डोक्यात दगड घातला

मोहाडी (भंडारा) : चोरीचे अनेक गुन्हे शिरावर असलेल्या सराईत चोरट्याचा चाकूने वार व डोक्यात दगड घालून खून करण्याची घटना मोहाडी येथे गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. तीन ते चार जणांनी खून केल्या कयास असून सर्वजण पसार झाले आहे.

चंद्रशेखर उर्फ रवरान काशीनाथ निपाने (३५) रा. टिळक वाॅर्ड, मोहाडी असे मृताचे नाव आहे. मोहाडी शहरातील इंदिरा वाॅर्डातील टावरजवळ रात्री ८.३० वा अज्ञात तीन ते चार जणांनी अचानक चंद्रशेखरवर चाकूने हल्ला केला. तसेच त्याच्या डोक्यात मोठा दगड घातला. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मोहाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. ठाणेदार निशांत मेश्राम घटनास्थळावर पथकासह पोहचले. वृत्तलिहिस्तोवर पंचनामा सुरु होता.

चंद्रशेखर हा सराईत चोरटा होता. त्याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे आहेत. मोहाडी येथील एका सोनाराचे सोने लुटून रायपूर येथे विकताना त्या दोन वर्षापूर्वी अटक करण्यात आली होती. त्या खून कुणी व कोणत्या कारणासाठी झाला हे मात्र कळू शकले नाही. मोहाडी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: Murder of a thief in Mohadi Bhandara district