शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या शिक्षकाचा खून; सरवड फाट्यावर अपघाताचा बनाव उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 18:32 IST

Murder Case : २६ जून रोजी सरवड ते लामकानी रोडवर सप्तशृंगी मंदिरासमोर रात्री ९ वाजेच्या सुमारास संदीपकुमार बोरसे या शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला होता.

ठळक मुद्देजिल्हा परिषद शिक्षक संदीपकुमार विश्वासराव बोरसे (३४, रा. सरवड, ता. धुळे) याच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी सोनगीर पोलीस करीत असताना धक्कादायक बाब उजेडात आली.

धुळे : तालुक्यातील सरवड फाट्यावर कारच्या धडकेत ठार झालेल्या जिल्हा परिषद शिक्षक संदीपकुमार विश्वासराव बोरसे (३४, रा. सरवड, ता. धुळे) याच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी सोनगीर पोलीस करीत असताना धक्कादायक बाब उजेडात आली. हा अपघात नसून खून असल्याचे समोर आल्यानंतर दोन जणांना अटक करण्यात आली. अनैतिक संबंधात संदीप हा अडचण ठरत असल्याने मित्रांनी त्याचा खून केल्याचे समोर आले.

२६ जून रोजी सरवड ते लामकानी रोडवर सप्तशृंगी मंदिरासमोर रात्री ९ वाजेच्या सुमारास संदीपकुमार बोरसे या शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला होता. वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची प्राथमिक माहिती सोनगीर पोलिसांत नोंदविण्यात आली होती. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू असताना मिळालेले धागेदोरे आणि मृताच्या नातेवाइकांनी व्यक्त केलेल्या संशयावरून अपघात नसून हा घातपात असल्याचा संशय निर्माण झाला. सोनगीर पोलिसांनी शरद दयाराम राठोड (३६, रा. पाडळदे, ता. धुळे, हल्ली मुक्काम जय मल्हार कॉलनी, साक्री रोड, धुळे) आणि राकेश ऊर्फ दादा मधुकर कुवर (कोळी) (३१, रा. सरवड, ता. धुळे) या दोघांना अटक केली.शरद राठोड याचे शिक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती झाल्यापासून संदीपकुमार दारूच्य नशेत कायम शरदला शिवीगाळ करीत होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला.

२६ जून रोजी रात्री शरद राठोड याने दादा कोळी याच्याशी संगनमत करून देवभाने फाट्यावर पार्टीच्या बहाण्याने संदीपकुमार याला कारने नेले. तेथे दारू पाजून संदीपकुमार यांना तर्र केले. तसेच रात्रीच त्यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने सरवड गावाजवळ रोडवरच सोडून दिले. त्यानंतर बोरसे हे घरी पायी जात असताना संदीपकुमार यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जोरात धडक देऊन उडविले. अपघाताचा बनाव करीत संदीपकुमार यांचा एक प्रकारे खून करण्यात आला. पोलिसांना घटनास्थळी मिळालेला कारचा लोगो, बंफरचे तुकडे, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज अशा काही पुराव्याच्या साहाय्याने गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला. शरद राठोड आणि राकेश कुवर यांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील व त्यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीDhuleधुळेPoliceपोलिसArrestअटक