शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डाेक्यात दगड घालून हत्या; आरोपीस १२ तासात पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 19:57 IST

Crime News :उदगीर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील पत्र्याच्या शेडमध्ये एका अनाेळखी व्यक्तीचा काेणीतरी अज्ञाताने अज्ञात कारणावरुन डाेक्यात दगड घालून खून केला.

लातूर : उदगीरच्या मध्यवर्ती बसस्थानकात एका साठ वर्षीय इसमाचा डाेक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली हाेती. दरम्यान, या खून प्रकरणी एकाला उदगीरच्या पाेलीस पथकाने बारा तासाच्या आत अटक केली आहे.

पाेलिसांनी सांगितले, उदगीर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील पत्र्याच्या शेडमध्ये एका अनाेळखी व्यक्तीचा काेणीतरी अज्ञाताने अज्ञात कारणावरुन डाेक्यात दगड घालून खून केला. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास समाेर आली. घटनास्थळी तातडीने उपविभागीय पाेलीस अधिकारी डॅनियल बेन, पाेलीस निरीक्षक गाेरख दिवे यांनी भेट दिली. मयत व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. अखेर बुधवारी ओळख पटविण्यात पाेलिसांना यश आले असून, बाबुराव पांचाळ (रा. लाेदा ता. भाजकी जि. बीदर) असे मयत व्यक्तीचे नाव असल्याचे पाेलिसांनी सांगितले. याबाबत उदगीर शहर पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

याप्रकरणी पाेलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी आरोपींच्या शोधबाबत उदगीर शहर पोलिसांना सूचना केल्या. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, पोलीस निरीक्षक गोरख दिवे, सपोनि. भीमराव गायकवाड, पोउपनि. एडके यांनी रात्रभर तपासाची चक्रे फिरवून घटनेबाबत विविध लोकांकडे कचरा वेचणारे व्यक्ती, रिक्षेवाले, हातगाडीवाले यांच्याकडे चौकशी केली. हाती आलेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयीत आरोपी ईरवंत नागनाथ मानकरी (४३ रा. देवणी) याला ताब्यात घेण्यात आले. याबाबत विश्वासात घेऊन अधिक चाैकशी केली असता, खून केल्याची कबुली दिली. ही कारवाई बबन टारपे, श्रीकृष्ण चामे, गजानन पुल्लेवाड, विष्णू गुंडरे, अभय सगर, पवन गायकवाड, जायभाये, राहुल गायकवाड, तुळशीराम बरुरे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसlaturलातूरArrestअटक