नागपुरात  पानटपरीचालकाची हत्या ; शेजारी जीवावर उठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 23:51 IST2021-01-11T23:50:17+5:302021-01-11T23:51:40+5:30

Murder of Pan kios opprator, crime news आजूबाजूच्या दोन पानटपरी चालकांमधील वाद अखेर एकाचा घात करणारा ठरला. शेजारच्या टपरीचालकाने साथीदाराच्या मदतीने घातक शस्त्राचे घाव घालून हत्या केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली.

Murder of Pan kios opprator in Nagpur; The neighbor woke up alive | नागपुरात  पानटपरीचालकाची हत्या ; शेजारी जीवावर उठला

नागपुरात  पानटपरीचालकाची हत्या ; शेजारी जीवावर उठला

ठळक मुद्देयशोधरानगरात थरार

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : आजूबाजूच्या दोन पानटपरी चालकांमधील वाद अखेर एकाचा घात करणारा ठरला. शेजारच्या टपरीचालकाने साथीदाराच्या मदतीने घातक शस्त्राचे घाव घालून हत्या केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली.

रियाज अन्सारी असे मृताचे नाव असून त्याची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीचे नाव अजहर खान आहे. रियाज आणि अजहर या दोघांची मांजरी रेल्वे लाइनजवळ वांजरा लेआऊटमध्ये आजूबाजूला पानटपरी आहे. त्यांच्यात ग्राहकांच्या कारणावरून नेहमीच वाद व्हायचे. अनेकदा हाणामारीही झाली. सोमवारी रात्री अशाच प्रकारे रियाज आणि अजहरमध्ये ग्राहकावरून वाद झाला. त्यानंतर अजहरने मुशिर आणि जावेद या दोन साथीदारांच्या मदतीने रियाजवर घातक शस्त्राचे घाव घालून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. अनेकांसमोर ही घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. माहिती कळताच यशोधरानगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी रियाजला मेयोत पोहोचविले असता डॉक्टरांनी रियाजला मृत घोषित केले. पोलिसांनी धावपळ करून रात्री तीन आरोपींना ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती होती.

Web Title: Murder of Pan kios opprator in Nagpur; The neighbor woke up alive