भांडणाचा राग मानत ठेवून एकाची हत्या; आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 19:20 IST2019-08-15T19:17:46+5:302019-08-15T19:20:23+5:30
याप्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून आरोपीला अटक करण्यात आलं आहे.

भांडणाचा राग मानत ठेवून एकाची हत्या; आरोपीला अटक
मुंबई - काल दुपारी ३ वाजताच्या सुमारास वांद्रे पूर्वेकडील हाजी तबेला चाळ येथे एका इसमास किरकोळ भांडणाचा राग मानत धरून धारदार शस्त्राने पोटावर वार करण्यात आला. या जीवघेण्या हल्ल्यात त्या इसमाचा मृत्यू झाला. मृत इसमाचं नाव अय्युब अफाकउल्ला हुसैन (२१) असं आहे. याप्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून आरोपीला अटक करण्यात आलं आहे.
वांद्रे येथील बेहरामनगर परीसरातील हाजी तबेला चाळीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या अय्युब अफाकउल्ला हुसैन (२१) याला आरोपीने त्यांच्यात झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून धारदार हत्याराने अय्युबच्या पोटात उजव्या बाजूस खुपसून हत्या केली. याबाबत नेवाजीस सिराज खान (२०) यांनी निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. निर्मलनगर पोलीस ठाण्यात अटक आरोपीविरोधात भा. दं. वि. कलम ३०२, म. पो. का. ३७ (१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भांडणाचा राग मानत ठेवून एकाची हत्या; निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल https://t.co/mD82AatBXl
— Lokmat (@MiLOKMAT) August 15, 2019