पत्नीचा खून, फरार पती जेरबंद श्रीरामपुरात कारवाई; पती जालना पोलिसांच्या स्वाधीन

By शिवाजी पवार | Updated: May 8, 2023 16:58 IST2023-05-08T16:56:45+5:302023-05-08T16:58:29+5:30

सापळा रचून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाची चाहूल लागताच भारस्कर याने पळ काढला.

Murder of wife, fugitive husband jailed action in Srirampur; Husband Jalna handed over to police | पत्नीचा खून, फरार पती जेरबंद श्रीरामपुरात कारवाई; पती जालना पोलिसांच्या स्वाधीन

पत्नीचा खून, फरार पती जेरबंद श्रीरामपुरात कारवाई; पती जालना पोलिसांच्या स्वाधीन

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : जालना जिल्ह्यात पत्नीचा खून करून श्रीरामपूर येथे आश्रय घेणार्या आरोपीला शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. पुढील तपासासाठी त्याला जालना पोलिसांच्या स्वाधित करण्यात आले. 

आरोपीचे नाव दिलीप गणपत भारस्कर (रा. शनिचौक, श्रीरामपूर) असे आहे. तो जालना जिल्ह्यातील शहागड येथे एका वीटभट्टीवर काम करत होता. संपूर्ण कुटुंबासह तो तेथे राहत होता. किरकोळ कारणावरून त्याचे पत्नी ज्योती हिच्या सोबत वाद झाले. त्यावेळी भारस्कर याने ६ मे या दिवशी पत्नीचा डोक्यात कुर्हाडीने घाव घालून खून केला होता. त्यानंतर तो तेथून पसार झाला होता. गोंडी पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फरार आरोपी हा येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाची चाहूल लागताच भारस्कर याने पळ काढला. अखेर पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. जालना पोलिसांना त्याबाबत माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी ही कारवाई केली.

Web Title: Murder of wife, fugitive husband jailed action in Srirampur; Husband Jalna handed over to police