एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची भोसकून हत्या; विष पिऊन तरूणाचाही आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2022 14:43 IST2022-03-06T14:43:41+5:302022-03-06T14:43:46+5:30
साताऱ्यातील पिंपोडे बुद्रुक येथील घटना

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची भोसकून हत्या; विष पिऊन तरूणाचाही आत्महत्येचा प्रयत्न
सातारा : जिल्ह्याला हादरून सोडणारी घटना कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे समोर आली असून, एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीची तरूणाने चाकूने भोसकून हत्या केल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडालीय. या घटनेनंतर संबंधित तरूणानेही विषारी आैषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पायल विकास साळुंखे (वय १७, रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी, पिंपोडे बुद्रुक गावातीलच निखील राजेंद्र कुंभार (वय२५) याने रविवारी सकाळी पायल साळुंखेवर अचानक चाकूने वार केले. यामध्ये पायल गंभीर जखमी झाली. तिला तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेनंतर निखील कुंभार यानेही विषारी आैषध प्राशन केले. त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार एकतर्फी प्रेमातून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.