जतमध्ये ३२ वर्षीय तरुणाचा खून, गेल्या १५ दिवसांत आठवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 11:00 IST2023-04-02T10:59:52+5:302023-04-02T11:00:06+5:30
सचिन उर्फ शशिकांत बिरा मदने हा व्यवसायाने ड्रायव्हर होता.

जतमध्ये ३२ वर्षीय तरुणाचा खून, गेल्या १५ दिवसांत आठवी घटना
सांगली : जत जवळील अथणी रोडवरील यल्लमा देवीच्या विहिरीकडे जाणाऱ्या रोडवर जत येथील मदने वस्तीवरील तरुण सचिन उर्फ शशिकांत बिरा मदने (वय ३२) याचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना रविवारी पहाटे घडली आहे.
सचिन उर्फ शशिकांत बिरा मदने हा व्यवसायाने ड्रायव्हर होता. तो यल्लामादेवी मंदीराजवळ मदने वस्ती येथे राहत होता. रात्री मदने हा आपल्या घरी नव्हता. त्यास दारूचे व्यसन असल्याचे सांगण्यात आले. पहाटे फिरायला जाणाऱ्या लोकांना त्याचा मृतदेह आढळला. यल्लमा देवीच्या विहिरीकडे जाणाऱ्या रोडवर विहिरी पासुन अलीकडे २०० मीटर अंतरावर ही घटना घडली आहे.
मारेकरी हा रात्रीपासून त्याच्या भ्रमण ध्वनीद्वारे सारखा संपर्कात होता. तो रात्रभर घरी नव्हता. नातेवाईकांनी शोध घेतला, मात्र सापडला नाही. आज सकाळी त्याचा मृतदेह आढळला. जागेवर जाऊन पोलीसांनी पंचनामा करुन त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांत जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठवा खून आहे. त्यामुळे जत परीसरात खुनाची मालिका सुरूच आहे.